Home » उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एलईडी बल्ब लावा, वीज वाचवा

एलईडी बल्ब लावा, वीज वाचवा

=पंतप्रधानांनी केला योजनेचा प्रारंभ=
PM MODI LOUNCHED LED BULBनवी दिल्ली, [५ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राजधानी दिल्लीत घरगुती वीज वाचविण्याच्या मोहिमेंतर्गत एलईडी बल्बचे वाटप केले. त्यांनी स्वत: आपल्या कार्यालयातही एलईडी बल्ब लावला. घराघरात व सरकारी कार्यालयांमध्ये एलईडी बल्ब लावा आणि वीज वाचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
एलईडीचे बल्ब म्हणजे ‘प्रकाश पथ’ आहेत. ते देश व समाजाला प्रकाशाकडे नेणारे आहेत, असे वर्णन करीत मोदी म्हणाले की, वीज निर्मितीपेक्षाही विजेची बचत करण्यासाठी हे बल्ब उपयुक्त आणि स्वस्त आहेत. या बल्बमुळे विजेची तर बचत होईलच, शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. इतर सामान्य बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे आयुष्य ५० पट जास्त असते. यामुळे विजेची बचत तर होतेच, शिवाय पैशांची बचतही होते.
मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने एलईडी बल्बचे वाटप करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत किमान शंभर शहरांमधील घरे आणि रस्त्यांवर हे बल्ब लावण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. दिल्लीकरांना केवळ दहा रुपयांमध्ये एक एलईडी बल्ब देण्यात येणार असून, आगामी १२ महिनेपर्यंत एका बल्बसाठी केवळ दहा रुपये, असे बिल आकारण्यात येणार आहे. या बल्बची तीन वर्षांची हमी राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19486

Posted by on Jan 6 2015. Filed under उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2286 of 2477 articles)


जम्मू, [५ जानेवारी] - लष्कर-ए-तोयबा या पाकस्थित अतिरेकी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईद ...

×