Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर » ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी

  • चार पुरस्कार पटकावले
  • एडी रेडमेन सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्युलियन मूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'Birdman' soars to Oscar heights on best picture winलॉस एंजेलिस, [२३ फेब्रुवारी] – हॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकूण चार पुरस्कार पटकावित ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने बाजी मारली. लॉस एंजेलिस येथे रविवारी रात्री पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ऑस्कर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारांचे हे ८७ वे वर्ष आहे. ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ चित्रपटातील कसदार अभिनयासाठी एडी रेेडमेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ज्युलियन मूर हिला ‘स्टील ऍलिस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यंदाच्या पुरस्कार समारंभात ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’, ‘बॉयहूड’, ‘अमेरिकन स्नायपर’ आणि ‘बर्डमॅन’ या चित्रपटांमध्ये मुख्य स्पर्धा बघायला मिळाली. एकूण नऊ विभागांमध्ये नामांकन मिळालेल्या ‘बर्डमॅन’ने सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार पटकावला. ‘बर्डमॅन’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक आलेजांंद्रो जी. इनारितो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘बॉयहूड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पॅट्रिशिया एराक्वेट हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा तर ‘व्हिपलॅश’या चित्रपटासाठी जे. के. सिमन्स याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
द ग्रँड बुडापेस्ट हॉटेलने बर्डमॅनला जोरदार स्पर्धा दिली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन हे पुरस्कार पटकाविले. ‘अमेरिकन स्नायपर’या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनी संपादनाचा पुरस्कार मिळाला. ‘इंटर्सटेलर’ला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस्‌चा पुरस्कार देण्यात आला. ‘क्रायसिस हॉटलाईन’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार देण्यात आला. परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘इडा’ या पोलंडच्या चित्रपटाला मिळाला. ऑस्करवर नाव कोरणारा हा पोलंडचा पहिला चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर ‘बिग हिरो ६’साठी देण्यात आला. ‘सेल्मा’तील ‘ग्लोरी…’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मुलभूत गाण्याचा ऑस्कर देण्यात आला. या रंगतदार सोहळ्याला हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20868

Posted by on Feb 24 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर (2026 of 2484 articles)


नवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज ...

×