Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » कजिता, मॅकडोनॉल्ड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल

कजिता, मॅकडोनॉल्ड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल

Takaaki Kajita, Arthur B. McDonald nobel winnerस्टॉकहोम, [६ ऑक्टोबर] – जपानचे तक्काकी कजिता आणि कॅनडाचे ऑर्थर मॅकडोनॉल्ड यांना यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या दोन्ही वैज्ञानिकांना न्यूट्रिनांच्या स्पंदनांचा शोध लावल्याबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्यांच्या या अभूतपूर्व शोधामुळे न्यूट्रिनांची संख्या माहीत करणे जगभरातील वैज्ञानिकांना शक्य झाले आहे. या दोघांनीही सुपर डिटेक्टरचा शोध लावला आहे. ज्या माध्यमातून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एक हजार किलोमीटरपर्यंत वायुमंडळातील न्यूट्रिनांचा शोध घेणे शक्य झाले आहे. जवळजवळ प्रकाशाच्या गतीने हे न्यूट्रिनो फिरत असतात.
कजिता जपानच्या काशिवा येथील टोकियो विद्यापीठात प्राध्यापक आणि कॉस्मिक रे रिसर्च संस्थेचे संचालक आहेत. तर, मॅकडोनॉल्ड हे कॅनाडातील किंगस्टनच्या क्वीन्स विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे या मुद्यांवर अभ्यास करण्याची आमची धारणाच बदलली आहे. ब्रह्मांडाविषयी आतापर्यंत आम्ही जो विचार करीत आलो, तोदेखील यामुळे बदलला आहे, असे मत नोबेल अकादमीने व्यक्त केले आहे. उद्या बुधवारी रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25005

Posted by on Oct 7 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1379 of 2483 articles)


पुणे, [७ ऑक्टोबर] - देशात बालगुन्हेगारीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यात मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले ...

×