Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कन्याभ्रूण हत्या म्हणजे रोगट मानसिकता

कन्याभ्रूण हत्या म्हणजे रोगट मानसिकता

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा थाटात शुभारंभ

modi-smriti-madhuri-menka-save girl childपानिपत, [२२ जानेवारी] – कन्या भ्रूणहत्या ही एक रोगट मानसिकता असून ती १८ व्या शतकाचे निदर्शक आहे. जर याला त्वरित आळा घातला नाही तर येणार्‍या पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
कन्या भ्रूणहत्या हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगून हे ‘सामाजिक पाप’ न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. देशातील जनतेला भावनिक याचना करताना ते म्हणाले, ‘देशाचा पंतप्रधान एखाद्या याचकाप्रमाणे मुलींना वाचविण्याची याचना करीत आहे. मुलींविषयी भेदभाव आणि गर्भातच तिची हत्या करणे म्हणजे रोगट मानसिकताच आहे. ही मानसिकता मुलाला महत्त्चपूर्ण मानते आणि मुलींना ‘परक्या घरी’ जाणारे लोढणे, असेही ते म्हणाले. स्त्री भ्रूण हत्येच्या कामात मदत करणार्‍या डॉक्टरांवरही पंतप्रधानांनी यावेळी टीका केली.
जन्माला येण्यापूर्वीच जर आम्ही मुलींना मारून टाकणार असू तर, आम्ही २१ व्या शतकाचे नागरिक म्हणविण्याच्या लायकीचेही राहणार नाही. आम्ही मानसिकदृष्ट्या अद्यापही १८ व्या शतकातील नागरिक आहोत. मात्र, या रोगट मानसिकतेबाबत आम्ही १८ व्या शतकालाही मागे टाकले आहे. १८ व्या शतकात निदान मुलगी जन्म तरी घेत होती, तिला निदान श्‍वास तरी घेता यायचा. पण, आताच्या या आधुनिक काळात जन्म घेण्यापूर्वीच, गर्भातच मुलीची हत्या करण्यात येते. मुलगा-मुलगी हा भेदच नष्ट करण्याचे जोरकस आवाहन करून पंतप्रधान म्हणाले, जर कन्या भ्रूणहत्या अशीच सुरू राहिली तर स्त्री-पुरुष दर अतिशय गंभीर स्वरूप धारण करेल. मुलगा व मुलगी यांच्या जन्मदरातील वाढती असमानता देशाच्या पातळीवर अतिशय चिंतेची बाब आहे. हरयाणात तर १०० मुलांमागे जवळजवळ पावणे नऊशे मुली असा दर आहे. ज्या हरयाणाने कल्पना चावलासारख्या महिलेला जन्म दिला ते राज्य ‘अन्य कल्पना चावलांची आईच्याच गर्भात हत्या करीत आहे, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. ही मानसिकता केवळ हरयाणातच नाही तर संपूर्ण देशातच आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘सुकन्या समृद्धी योजने’चाही औपचारिक प्रारंभ करीत पाच मुलींचे खात्यांचे पासबुक त्यांच्याकडे सुपूर्द केले.
माधुरी दीक्षित ब्रॅण्ड ऍम्बेसेडर
ख्यातनाम बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित केंद्राच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असून, ती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. आईची तब्येत बरी नसूनही माधुरी या कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी तिचे कौतुक केले. हे अभियान प्रारंभी देशातील १०० जिल्ह्यात राबविले जाणार आहे, जेथे स्त्री-पुरुषांचे व्यस्त प्रमाण आहे. यात हरयाणातील १२ जिल्ह्यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19903

Posted by on Jan 23 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2197 of 2477 articles)


डाव्होस, [२२ जानेवारी] - विदेशी बँकांमध्ये पडून असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्यासाठी भाजपाप्रणीत रालोआ सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच ...

×