Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » करदात्यांच्या मनातील भीती काढण्यावर भर द्या: मोदी

करदात्यांच्या मनातील भीती काढण्यावर भर द्या: मोदी

=पहिल्या राजस्व ज्ञान-संगमचे उद्‌घाटन=
pm-modi-at-rajasv-gyan-sangam-annual-conference-of-taxनवी दिल्ली, [१६ जून] – करदात्यांच्या मनातले भय दूर करण्यासाठी प्रशासनातील पाच स्तंभ राजस्व (Revenue), उत्तरदायित्व (Accountability), इमानदारी (Probit), सूचना (Information) आणि डिजिटलीकरण (Digitlisation) म्हणजेच (RAPID) वर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर विभागातील अधिकार्‍यांना केले.
येथे आयोजित पहिल्या राजस्व ज्ञान-संगमचे उद्‌घाटन करताना मोदी बोलत होते. यावेळी केलेल्या मार्गदर्शनात मोदी पुढे म्हणाले की, अधिकार्‍यांनी प्रशासनाला अधिक चांगले आणि दक्ष बनवण्यासाठी डिजिटलीकरण करण्याच्या दिशेने पावले टाकून निर्माण झालेल्या अविश्‍वासाच्या दरीला कमी करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे.
देशात पहिल्यांदाच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज ऍण्ड कस्टम (सीबीइसी) यांची संयुक्त बैठक आयोजिण्यात आली असून त्याला राजस्व ज्ञान-संगम असे नाव देण्यात आले आहे.
या ज्ञान-संगममध्ये दोनही विभागातील २५० पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमातून फक्त आपल्या विभागाच्या उपलब्धींचा लेखाजोखा सादर करायचा नसून एकमेकांशी संबंधित माहितीचे आदान प्रदानही करण्यासोबतच येणार्‍या अडचणी दूर करण्याबाबत अवगत करणे, हा ही बैठक आयोजनामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
मोदींना काय करायचे आहे!
सामान्य करदात्याच्या मनातील भीती काढून टाकण्यास मोदी यांची प्राथमिकता असून कर भरणा अतिसरळ बनवण्यावर त्यांचा भर आहे. सोबतच कराबाबत निर्माण झालेला भ्रम दूर करणे, कराबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासही प्राथमिकता देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. कार्पोरेट टॅक्स रेट आणि सवलत कमी करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करून काळ्या पैशामुळे देशाला जे नुकसान पोहोचवत आहेत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची तयारी मोदी सरकार करीत असल्याचेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28634

Posted by on Jun 17 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (224 of 2477 articles)


=कमलनाथांचा राजीनामा हा तर दंगलीतील सहभागाचा पुरावाच: भाजपा= नवी दिल्ली, [१६ जून] - पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारीपदाचा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ...

×