Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

►आझाद हिंद सेनेतील अखेरचा सैनिक,
वृत्तसंस्था
आझमगड, ६ फेब्रुवारी –
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अखेरचे सैनिक कर्नल निजामुद्दिन यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला.
उत्तरप्रदेशच्या आजमगड येथील मुबारक भागात ढकवा येथे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विशेष म्हणजे, कर्नल निजामुद्दिन यांचा आशीर्वाद घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
कर्नल निजामुद्दिन यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. निजामुद्दिन यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आझाद हिंद सेनेचे ओळखपत्र सांभाळून ठेवले होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे कर्नल निजामुद्दिन यांनी स्वागत केले होते.
पंतप्रधानांना दु:ख
कर्नल निजामुद्दिन यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एका महान स्वातंत्र्य सेनानीला देश आज मुकला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29410

Posted by on Feb 7 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (67 of 2477 articles)


=स्थिर आणि विकासाभिमुख सरकारला जनतेची पसंती, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - जनतेला स्थिर आणि विकासाभिुमख सरकार हवे असल्यामुळे ...

×