Home » उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान

काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान

=३४,५५५ कोटींच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण=
pm-modi-at-launch-of-iocl-s-paradip-refinery-in-odishaपारादीप (ओडिशा), [७ फेब्रुवारी] – एखादा राष्ट्रीय प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला पूर्णत्वाकडे नेताना प्रचंड विलंब लागतो आणि त्यामुळे प्रकल्पावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते. अशाप्रकारे काम करण्याची ही जुनी परंपरा अजूनही सुरू आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करताना कोणताही प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी नवी संस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केले.
आमच्या काळात सुरू झालेल्या प्रकल्पांचेच पंतप्रधान मोदी उद्‌घाटन करीत आहेत, असा आरोप करणार्‍या कॉंगे्रसला चांगलेच धारेवर धरताना पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असते आणि त्यातून हजारो हातांना रोजगार मिळाला असता, तर पंतप्रधान म्हणून मला खरोखरच आनंद झाला असता. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ३४,५५५ कोटी रुपयांच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कच्च्या तेलाचे उत्पादन देशातच वाढवून तसेच इथेनॉलसारख्या जैविक इंधनाला प्रोत्साहन देऊन २०२२ पर्यंत तेलाची आयात किमान दहा टक्क्यांनी कमी करण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे. अशा स्थितीत या प्रकल्पाचे उद्‌घाटन करताना मला स्वाभाविकच आनंद होणार आहे. मात्र, पंतप्रधान म्हणून मी फारसा आनंदी नाही. कारण, हा प्रकल्प फार जुना आहे आणि १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता, तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
देशाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी, कोणताही प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण होईल, यासाठी कामाच्या संस्कृतीत बदल करण्याची जबाबदारी नागरिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योग आणि सरकार असे मिळून आपल्या सर्वांचीच आहे आणि ती आपण पार पाडायलाच हवी. प्रकल्प वेळीच पूर्ण झाला, तर त्यावरील खर्च कमी होतो आणि हजारो-लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. यातून देशालाही मोठा फायदा मिळत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26783

Posted by on Feb 8 2016. Filed under उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. Both comments and pings are currently closed.

Comments are closed

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (844 of 2477 articles)


पाकचा दहशतवादी चेहरा जगापुढे येणार उज्ज्वल निकम यांची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर मुंबई, ७ [फेब्रुवारी] - २६/११ रोजीच्या मुंबई ...

×