Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश

किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश

modi, amit shah, kiran bediनवी दिल्ली, [१५ जानेवारी] – माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कधीकाळी टीम अण्णाच्या सदस्य असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बेदी दिल्ली विधानसभेची निवडणूकही लढणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. भाजपाच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी किरण बेदी यांचे स्वागत केले. किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाने आपल्या कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून समोर केले नव्हते. मात्र, किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्याच भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार राहतील, हे स्पष्ट झाले आहे. भाजपाने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार भाजपा संंसदीय पक्षाचा आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
किरण बेदी भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, ती आज प्रत्यक्षात आली. अमित शाह आणि अरुण जेटली यांनी किरण बेदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एसएमएसच्या माध्यमातून किरण बेदी यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. किरण बेदी यांचे मी भाजपात स्वागत करतो, त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाला ताकद मिळेल, असे अमित शाह यांनी सांगितले.
समाजातील चांगली माणसे राजकारणात यावी, असाच आमचा प्रयत्न होता. किरण बेदी यांच्यासारखी अनुभवी, प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्‍नाबद्दल तळमळ असलेली व्यक्ती भाजपात आल्याचा मला आनंद आहे, असे अरुण जेटली यांनी म्हटले.
दिल्लीत स्थिर आणि सक्षम सरकारची गरज असल्याचे किरण बेदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापुढे दिल्ली हीच माझी प्राथमिकता राहणार आहे. माझ्याजवळ ४० वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. या अनुभवाचा आणि ऊर्जेचा उपयोग दिल्लीच्या जनतेसाठी करण्याचा निर्धार बेदी यांनी व्यक्त केला. मी काम करणारी आहे, आणि मला काम करवूनही घेता येते, असेही बेदी यांनी म्हटले. किरण बेदी या आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा चेहरा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व अजय माकन यांच्याकडे राहणार आहे, तर आम आदमी पार्टीची धुरा अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19745

Posted by on Jan 16 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2231 of 2477 articles)


कटक, [१५ जानेवारी] - ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’ अशी गर्जना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे ...

×