Home » कला भारती, छायादालन, ठळक बातम्या » ‘किशोरदां’ची जादू गूगलवरही

‘किशोरदां’ची जादू गूगलवरही

मुंबई, [४ ऑगस्ट] – भारतीय सिनेसृष्टीवर आपली जादू कायम ठेवणार्‍या किशोरदादांनी आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. गायक, संगीतकार, अभिनेता अशी ओळख असलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९रोजी मध्ये प्रदेशातील खाडवा जिल्ह्यात झाला. आज त्यांची ८५वी जयंती आहे. या निमित्ताने प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गूगलनेही किशोर कुमार यांना सलाम केला असून गूगलडुडलवर त्यांचे चित्र ठेवण्यात आले आहे.
प्रेम गीत, विरह गीत गाणारे किशोर कुमार हे ‘यॉडलिंग’ स्टाइलने गाण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या या स्टाइलची गाणी आजही तरूणांमध्ये हिट आहेत. किशोरदांनी फक्त हिंदीतच नव्हे तर अनेक भाषांमधील गाण्यांना स्वरसाज चढविला. ‘शिकारी’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायक म्हणून त्यांना आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
किशोर कुमार यांचे खाजगी आयुष्य
किशोर कुमार आपल्या भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचे वडील कुंजालाल गांगुली वकील तर आई गृहिणी होत्या. त्यांनी आयुष्यात चार वेळा लग्न केले. त्यांची पहिली पत्नी रूमा गुहा ठाकुरता, दुसरी पत्नी अभिनेत्री मधुबाला, तिसरी योगिता बाली आणि चौथी पत्नी लीना चंदावरकर. लिना चंदावरकर त्याच्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत सोबत होत्या. किशोर कुमार यांना दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून झालेला गायक अमित कुमार आणि लीना चंदावरकरपासून झालेला सुमीत कुमार. किशोर कुमार आज आपल्यात नसले तरी पण त्यांचे गाणे मात्र चाहत्यांच्या मनात रेंगाळत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14673

Posted by on Aug 5 2014. Filed under कला भारती, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, छायादालन, ठळक बातम्या (2411 of 2482 articles)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोन दिवसांच्या नेपाळ भेटीवर आगमन झाले. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला सर्व ...

×