Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांच्या डोळ्यापुढे शेतकर्‍याची आत्महत्या

केजरीवालांच्या डोळ्यापुढे शेतकर्‍याची आत्महत्या

farmer sucided in delhiनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – दिल्लीत सत्तारूढ आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधात बुधवारी केलेल्या आंदोलनादरम्यान राजस्थानच्या एका शेतकर्‍याने आज बुधवारी झाडावरच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
गजेंद्र सिंग राजपूत असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव असून, तो राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. झाडावर चढल्यानंतर एका फांदीला दोर बांधून केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा त्याने प्रयत्न केला. आपच्या नेत्यांनीही त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी झाडावरून खाली उतरण्याचे आवाहन केले. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. काही क्षणातच त्याने गळफास लावला. पोलिस आणि इतरांनी त्याला झाडावरून खाली आणले आणि तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले. पण, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने, ‘मित्रांनो, मी शेतकर्‍याचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढले आहे. माझे नाव गजेंद्रसिंग राजपूत असून, मला तीन मुले आहेत. मला कोणतेही काम नाही. जय जवान, जय किसान, जय राजस्थान,’ असे लिहिले होते. दरम्यान, या घटनेवरून विविध राजकीय पक्षांनी केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर सडकून टीका केली. केजरीवालांच्या असंवेदनशीलतेमुळेच या शेतकर्‍याने आत्महत्या केली असून, त्याच्या परिवाराला दिल्ली सरकारने पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते सतीश उपाध्याय यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना दिले आहेत. राजनाथसिंह यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ही घटना संपूर्ण देशासाठी दुःखदायक असून आम्ही सर्वजणांना या घटनेचा धक्का बसला आहे. गजेंद्रसिंग यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या घटनेनंतर कुमार विश्‍वास, आशुतोष व संजय सिंह यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत प्रसिद्धी माध्यमांवरच आगपाखड केली. तुम्ही जाऊन त्याला खाली का उतरवले नाही, असा उलट सवाल कुमार विश्‍वास यांनी केला. तर केजरीवालांनी या घटनेचे खापर पोलिसांवर फोडले.
आम्ही वारंवार पोलिसांना सांगत होतो परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही, असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. संपूर्ण देशभरात आम आदमी पार्टीचा निषेध केला जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22235

Posted by on Apr 23 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1762 of 2477 articles)


जयपूर, [२२ एप्रिल] - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २५ एप्रिल रोजी आपल्या राजस्थान दौर्‍यात महाकार्यकर्ता संमेलनाला संबोधित ...

×