Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » केरळ हिंसाचार: भाजपाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

केरळ हिंसाचार: भाजपाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

bjp leaders meet president on kerala attackनवी दिल्ली, [२२ मे] – केरळात सत्तेवर येताच माकपप्रणीत डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा कळस गाठला असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून आतापर्यंत केरळात हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. कॉंगे्रस पक्षानेही या घटनांवर मौन पाळले आहे. लोकशाहीसाठी हा प्रकार नक्कीच चांगला नाही, अशा आशयाचे निवेदन भाजपा शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सादर केले आहे.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे नितीन गडकरी म्हणाले की, माकपाचे कार्यकर्ते भाजपा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांवर घातक हल्ले करीत आहेत. अनेक जण यात गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनीही बघ्यांची भूमिका घेतली असल्याने आम्हाला राष्ट्रपतींचे दार ठोठवावे लागले. या सर्व हिंसक घटनांची सविस्तर माहिती आम्ही छायाचित्रांसह राष्ट्रपतींना सादर केली आहे. आमचा प्रमोद नावाचा एक कार्यकर्ता माकपाच्या हल्ल्यात ठार झाला. शंभरांवर घरांचे त्यांनी नुकसान केले आहे. राष्ट्रपतींनी आम्हाला योग्य कारवाईचे आश्‍वासन दिले आहे.
दुर्दैवाने कॉंगे्रस पक्षही याकडे शांतपणे पाहात आहे. लोकशाहीसाठी ही बाब नक्कीच चांगली नाही. लोकशाहीत राजकीय पक्ष विचारधारेच्या आधारावर लढत असतात. पण, त्यांनीच कायदा हातात घेतला, तर स्थिती हाताबाहेर जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
माकपा कार्यालयाबाहेर भाजपाची निदर्शने
माकपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात भाजपाचा कार्यकर्ता ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज माकपाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. पोलिसांचे कठडे बाजूला सारून भाजपाचे कार्यकर्ते मुख्यालयापर्यंत पोहोचले. यावेळी पोलिसांनी भाजपाच्या ६०० जणांना ताब्यात घेतले.
भाजपाचे आरोप खोटे : येचुरी
भाजपाने माकपावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. उलट जनाधार मान्य न झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच आमच्या विजयी मिरवणुकीवर हल्ला केला. केरळात जो हिंसाचार सुरू आहे, तो भाजपाचाच आहे, असा आरोप माकपाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. केरळातील जनतेने भाजपाला मतदान न केल्याने हा पक्ष संतप्त झाला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या लोकांवर हल्ले सुरू केले असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत, असेही येचुरी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28410

Posted by on May 22 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (297 of 2477 articles)


=कॉंग्रेसमध्ये घमासान= नवी दिल्ली, [२२ मे] - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेल्या बेचैनीसह मोठे ...

×