Home » उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

-अन्यथा कार कंपन्यांवर कारवाई
-•नितीन गडकरी यांचा इशारा,
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर –
पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती करण्याऐवजी केवळ पर्यावरणपूरक गाड्याच तयार करा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासावा लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी दिला आहे.
सिऍम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विजेवर चालणार्‍या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार झाला आहे. त्यात वाहने चार्ज करणार्‍या केंद्रांचा विचार करण्यात आला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
सर्व कार कंपन्यांनी २०३० पर्यंत इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करावी. या गाड्या पर्यावरणपूरक असल्याने केवळ त्यांनाच रस्त्यावर चालण्याची परवानगी राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत तेल किंवा पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या गाड्यांपासून सुटका करू इच्छिते. त्यासाठी २०३० पर्यंतची कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तोपर्यंत कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन वाढवायलाच हवे, असे झाले नाही तर पेट्रोल व डिझेलवर चालणार्‍या आणि धूर सोडून प्रदूषणात वाढ करणार्‍या गाड्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण आणि इंधन आयतीला वेसण घालण्याच्या निर्धाराशी माझे मंत्रालय वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्याला पर्यायी इंधनाकडे वाटचाल करावी लागणार आहे. मी जे बोलतो ते तुम्हाला आवडणार नाही. पण त्याबद्दल मी तुम्हाला (कार कंपन्यांना) विचारणारही नाही. मी या गाड्या उद्‌ध्वस्त करणार आहे. प्रदूषण, वाहनांची आयात यासारख्या मुद्यांवर माझी भूमिका स्पष्ट आहे. कच्च्या तेलाची आयात घटवणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे धोरण ठरले आहे. ज्या कंपन्या सरकारचे समर्थन करतील, त्या फायद्यात राहतील. पण, ज्या कंपन्या नोटा छापण्यात व्यस्त असतील त्यांना त्रास होईल, असा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34919

Posted by on Sep 9 2017. Filed under उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (27 of 2477 articles)


►भारतीय लष्कराचा पाकला इशारा, नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना सातत्याने ...

×