Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कॉंग्रेसचे ६आमदार फोडण्याचा केला होता प्रयत्न

कॉंग्रेसचे ६आमदार फोडण्याचा केला होता प्रयत्न

=केजरीवाल यांच्यावर यादव यांचा घणाघाती आरोप=
arvindkejriwal-yadavनवी दिल्ली, [११ मार्च] – देशातील राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्याचा नारा देत राजकारणात उतरलेल्या आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचे स्टिंग करून त्यांना अडचणीत आणण्यात हातखंडा असलेलल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा आज बुधवारी पर्दाफाश झाला. गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा विसर्जित होण्याची शक्यता लक्षात घेता केजरीवाल यांनी आपचे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसच्या सहा आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांनी या मुद्यावर पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांच्यासोबत विस्तृत चर्चाही केली होती. त्यांच्या चर्चेची ऑडिओ टेपच इंडिया टीव्ही न्यूजने जारी केली असून, यामुळे स्वच्छ प्रतिमेचा आव आणणार्‍या केजरीवाल यांच्या पक्षाचा खरा चेहरा दिल्लीकरांना पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या ऑडिओ टेपमधील आवाज केजरीवालांचाच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आपला दिल्ली विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सहा आमदारांची गरज होती आणि हे सहा आमदार कॉंग्रेसमधूनच फोडायचे, अशी योजना केजरीवाल यांनी आखली होती. ही योजना तडीस नेण्यासाठी मनीष सिसोदिया हेदेखील कॉंग्रेस आमदारांच्या सातत्याने संपर्कात होते. आपचे अन्य काही वरिष्ठ नेतेही या कामात व्यस्त होते. कॉंग्रेसच्या सर्वच आठही आमदारांसोबत त्यांनी संपर्क साधला होता. पैसा आणि सरकारमध्ये मंत्रिपद अशा सर्वच ऑफर त्यांना देऊ केल्या. स्वत: केजरीवाल यांनीही या आमदारांच्या भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. या आठपैकी सहा आमदार तयारही झाले होते. पण, अजय माकन, रणदीप सूरजेवाला आणि अ. भा. कॉंग्रेस समितीतील काही वरिष्ठ नेत्यांना या घडामोडीची माहिती मिळाली आणि त्यांनी आपच्या प्रयत्नांना खिळ लावली होती.
सर्व घडामोडींवर स्वत: केजरीवाल लक्ष ठेवून होते. विधानसभा विसर्जित होण्याआधी कोणत्याही स्थितीत कॉंग्रेसचे आमदार फोडायचेच, असा चंगच त्यांनी बांधला होता. या प्रयत्नांना यश येत नसल्याचे पाहून केजरीवाल निराश झाले होते. तेव्हा गर्ग यांनी त्यांना मोहल्ला पातळीवर सभा आयोजित करण्याचे आणि आपच्या मदतीकरिता समोर येण्याचे जाहीरपणे आवाहन करण्याचा सला दिला. या प्रक्रियेत काही आमदार जर आपल्या बाजूने आले, तर सरकार स्थापन करणे आणखी सोपे जाईल, असे गर्ग यांचे मत होते. मात्र, केजरीवाल यांना हा प्रस्ताव मान्य झाला नव्हता, असेही या संभाषणातून स्पष्ट झाले आहे.
यादव यांचा ‘लेटर बॉम्ब’
अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसचे सहा आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट करणारा ऑडिओ टेप बाहेर आला असतानाच, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी आज बुधवारी आम आदमी पार्टीला आणखी संकटात टाकले आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आणि पक्षात जे काही सुरू आहे, त्यावर शांत राहून विचार करा, असे आवाहन केले.
आपच्या चार वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर निराधार आरोप लावले आहेत. त्यामुळेच आम्हाला हे पत्र लिहिणे भाग पडले आहे, असे योगेंद्र यादव यांनी पत्रपरिषदेत पत्र जाहीर करताना सांगितले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी केजरीवाल हे कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
हे पत्र पक्षाच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर प्रसिद्ध करावे. पक्षात नेमके काय सुरू आहे, याची माहिती दिल्लीसह देशातील जनतेला मिळायलाच हवी. या पत्रामुळे गोंधळून जाऊ नका, शांत राहा आणि गंभीरपणे विचार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दमानिया यांचा राजीनामा
स्वत: माजी आमदार गर्ग यांनीही केजरीवालांसोबतच्या चर्चेचा हा ऑडिओ टेप जारी केला. यामुळे संतप्त झालेल्या आपच्या वरिष्ठ नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केजरीवाल तत्त्ववादी आहेत, असे मला वाटले होते आणि म्हणूनच मी त्यांच्या समर्थनार्थ या पक्षात आले होते. आमदारांची खरेदी-विक्री करण्याकरिता नाही. हा पक्षही इतर पक्षांसारखाच निघाला, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21288

Posted by on Mar 12 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1939 of 2477 articles)


=ब्रिक्स बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून एकाचा विचार= नवी दिल्ली, [११ मार्च] - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ...

×