Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

मुंबई, २४ जून – शाळेऐवजी पालक संघटनेशी करारबद्ध असणार्‍या खासगी वाहनांनाही यापुढे ‘स्कूल बस’ परमिट दिले जाऊ शकते, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. मात्र स्कूल बससाठीच्या सर्व सुरक्षा नियमांची पूर्तता करणे त्यांना बंधनकारक राहील, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
पालक शिक्षक संघटनेच्यावतीने स्कूल बसच्या संदर्भात एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ज्यात खाजगी वाहनांनाही स्कूलबसचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. यावर न्यायालयाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यावर बाजू मांडताना सरकारने सांगितले की, शाळेऐवजी पालक संघटनेशी करारबद्ध असणार्‍या खासगी वाहनांनाही स्कूलबस परवाने देण्यास सरकार अनुकूल आहे. पण यासाठी स्कूलबससाठीच्या सर्व सुरक्षा नियमांची पूर्तता करणे बंधनकारक आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता किमान १२ आसनांची क्षमता असलेल्या चारचाकी आणि पक्क छत असलेल्या तीनचाकी खाजगी वाहनांना स्कूल व्हॅनचा परवाना मिळवणं शक्य होणार आहे. तसेच एकाच स्कूलबसमधून विविध शाळेतील मुलांची एकत्र वाहतूक करणे शक्य होणार आहे. यामुळे एकाच परिसरातील विविध शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सोयीचे होईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34803

Posted by on Jun 25 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (49 of 2476 articles)


नवी दिल्ली, २३ जून - रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ...

×