Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गरिबांच्या कल्याणाला बैठक समर्पित : राम माधव

गरिबांच्या कल्याणाला बैठक समर्पित : राम माधव

bjp_national_president_amit_shah_lights_lamp_at_the_inauguration_of_national_council_meeting_in_kozhikodeकोझिकोड, [२३ सप्टेंबर] – गरिबांच्या कल्याणाच्या योजनांवर भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या उद्यापासून कोझिकोड येथे होत असलेल्या बैठकीत व्यापक विचारमंथन होणार असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.
भाजपाच्या राष्ट्रीय परिषद बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर आज कोझिकोड येथील कडावे रिसॉर्टमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संबोधित केले.
या बैठकीतील कामकाजाची तसेच भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत होणार्‍या कामकाजाबद्दल माहिती देतांना राम माधव म्हणाले की, समाजाच्या तळागाळातील तसेच शोषित आणि वंचित वर्गाच्या कल्याणाबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. समाजाच्या उपेक्षित वर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी भाजपा कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या परिषदेत गरिबांच्या कल्याणाची सर्वांगीण योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून या अहवालाची अंमलबजावणी करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या अहवालाची सरकारी पातळीवर तर अंमलबजावणी होणार आहेच, पण संघटनात्मक पातळीवरही याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा अध्यक्ष अमित शाह यांचा आग्रह असल्याचे राम माधव यांनी सांगितले.
गरीब कल्याण कार्यक्रमांची अंमलबजावणी भाजपाशासित राज्यांनी प्राधान्याने करावी, तसेच पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षात यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी अमित शाह यांची भूमिका आहे, याकडे लक्ष वेधत राम माधव म्हणाले की, अन्य राज्यांनी यात राजकारण न आणता गरीब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली पाहिजे.
कोझिकोड येथे होणारी भाजपा राष्ट्रीय परिषदेची बैठक सर्वाथाने वेगळी आहे, नवा पायंडा पाडणारी आहे, याकडे लक्ष वेधत राम माधव म्हणाले की, या बैठकीत पक्षाच्या विस्ताराबद्दल तसेच निवडणूक जिंकण्याबद्दल चर्चा होणार नाही, तर देशातील गोरगरिबांच्या कल्याणाबद्दल चर्चा होणार आहे. ही बैठक सकारात्मक विचाराला आणि विधायक कार्याला समर्पित आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची एकात्म मानववादाची तसेच अंत्योदयची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा भाजपाचा निर्धार आहे, त्यादृष्टीने या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याचे राम माधव यांनी स्पष्ट केले. देशातील अन्य राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा होईल, काही ठरावही पारित केले जातील, असे ते म्हणाले.
मंत्र्यांची विधाने हवी की प्रत्यक्ष कृती
गरीब कल्याणाचा मुख्य अजेंडा असलेल्या भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीवर उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा प्रभाव दिसून आला. याबाबत पत्रकारांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली असता राम माधव यांनी, तुम्हाला फक्त नेत्यांनी केलेली विधाने अपेक्षित आहे की प्रत्यक्ष कृती, अशी विचारणा करत पाकिस्तानबाबत भविष्यात सरकारची भूमिका काय राहणार याचे संकेत दिले. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर योग्य व्यासपीठावर चर्चा होईल, आणि काय चर्चा झाली, त्याची माहितीही तुम्हाला दिली जाईल, असे राम माधव म्हणाले. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर बरेच काही केले, त्याचे योग्य परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील, असे राम माधव यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29294

Posted by on Sep 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (95 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२३ सप्टेंबर] - क्षेपणास्त्र व शस्त्र प्रणालीने सुसज्ज असलेली ३६ राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारताने ...

×