Home » आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » गरिबी, भ्रष्टाचाराचे उच्चाटन हेच ध्येय : मोदी

गरिबी, भ्रष्टाचाराचे उच्चाटन हेच ध्येय : मोदी

=विकास, जलदविकास, सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध=

Prime Minister Narendra Modi addressing the gatherings during Vijay SanKalp Samabesh at TinsuKia in Assam on Saturday. PHOTO:REBA KUMAR BORAH

तिनसुखिया, [२६ मार्च] – आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर टीका केली आहे. माझी लढाई मोदी यांच्याशी आहेत, असे गोगोई सांगत आहे. पण मी तर त्यांच्यापेक्षा बराच लहान आहे, असे स्पष्ट करताना, माझी लढाई गोगोईविरुद्ध नसून गरिबी आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे हेच आपले ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
तिनसुखिया येथील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, नाव तिनसुखिया असले, तरी येथील लोक मात्र दु:खी आहेत. नावातील सुखियाला आम्हाला खर्‍या अर्थाने सार्थ करायचे आहे. प्रत्येकाला सुखी बघणे हेच आमच्या सरकारचे धोरण आहे. चांगले दिवस येतील, या आशेवर तुम्ही ६० वर्षे कॉंग्रेसच्या हाती सत्ता सोपविली. मी तर फक्त पाच वर्षे आमच्या हाती सत्ता सोपविण्याची मागणी करीत आहे. याचा फायदा आसामला मिळणार आहे. माझा लढा गोगोई यांच्याविरुद्ध नाही. आमची लढाई गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देश स्वतंत्र झाला त्यावेळी आसाम हे समृद्ध राज्य होते. पण आज याची गणना गरीब राज्यात केली जाते. आसामच्या चहाने जगभरात नाव कमावले असून, याच चहामुळेच जगात भारताने इतर देशांचे प्रेम मिळविले आहे. देशातील नागरिक येथील चहा नित्यनेमाने घेत असतात आणि यामुळेच काम करताना त्यांच्यात नवा उत्साह संचारतो, असेही मोदी म्हणाले.
राज्यातील अनेक गावांमध्ये आजही विजेचे खांब नसल्याने विकास खुंटला आहे. जलदगतीने विकास आणि सर्वांगिण विकास हेच आमचेे मुख्य ध्येयधोरण आहे. याच माध्यमातून विकासाची गंगा राज्यात पोहोचेल आणि येथील परिस्थितीत सुधारणा होईल. गरिबांना चांगले शिक्षण मिळावे, युवकांना रोजगार आणि वृद्धांना औषधे मिळावी हाच विकासाचा खरा मंत्र असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेला सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27595

Posted by on Mar 27 2016. Filed under आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (565 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२६ मार्च] - घोडेबाजाराचे स्टिंग ऑपरेशन असलेली सीडी कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज जारी केल्यामुळे आधीच अडचणीत असलेले उत्तराखंडचे ...

×