Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » गांधीजींच्या विचारात जागतिक समस्यांवर तोडगा

गांधीजींच्या विचारात जागतिक समस्यांवर तोडगा

=पंतप्रधानांचे प्रतिपादन=
Unveiling a bust of Mahatma Gandhi in Turkmenistanअशगबात (तुर्कमेनिस्तान), [११ जुलै] – दहशतवाद आणि हवामान बदल यासारख्या समस्या कोणत्याही एका देशापुरत्या मर्यादित नसून, संपूर्ण जग त्यांचा सामना करीत आहे. महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि विचारातूनच या समस्यांवर तोडगा काढला जाऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे केले.
तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगबात येथे पारंपरिक औषधी आणि योग केंद्राचे उद्‌घाटन केल्यानंतर आयोजित समारंभात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले. संपूर्ण जगापुढे आज सर्वात गंभीर समस्या दहशतवाद आणि वातावरणातील बदलाचीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने महात्मा गांधींचे विचार आत्मसात करायला हवे. तुर्कमेनिस्तानमधील नागरिकांनी महात्मा गांधींचे आयुष्य आणि विचारांचा बोध घेतला असावा, असा माझा विश्‍वास आहे. योगासनामुळे मनुष्याला नैसर्गिक जीवन जगणे शक्य होते. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून, शरीर, मन, आत्मा आणि बुद्धीचा एकाचवेळी विकास करणारे माध्यम आहे. या चारही महत्त्चाच्या घटकांना योग एकमेकांशी जोडत असतो. योग करताना आपले शरीर किती वाकते याचा विचार करू नका. केवळ मन आणि बुद्धी स्थिर ठेवण्यावरच भर द्या, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.
सात करारांवर स्वाक्षरी
दरम्यान, भारत आणि तुर्कमेनिस्तान यांच्यात द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सात महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. संरक्षण, रासायनिक उत्पादनांचा पुरवठा, परराष्ट्र व्यवहार, क्रीडा, विज्ञान, औषध आणि पर्यटन या क्षेत्रांशी संबंधित हे करार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्दीमुहमदोव्ह यांच्यातील चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23401

Posted by on Jul 12 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1571 of 2483 articles)


=पाकमधील मीडियाची स्तुतिसुमने= इस्लामाबाद, [११ जुलै] - पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा जो निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्यादिशेने ...

×