Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » गोलरक्षक सर्जियो रोमेरोचे अप्रतिम रक्षण

गोलरक्षक सर्जियो रोमेरोचे अप्रतिम रक्षण

=२४ वर्षांनंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत=
साओ पाउलो, [१० जुलै] – १२० मिनिटे रोमहर्षक ठरलेल्या उपांत्य सामन्यात लियोनेल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने नेदरलॅण्ड संघाचा पेनल्टी शूटआउट्‌समध्ये ४-२ गोलने पराभव करीत विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तब्बल २४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अर्जेंटिनाचा संघ निर्णायक लढतीसाठी पात्र ठरताच अर्जेंटिना देशात प्रचंड जल्लोष करण्यात आला.
अर्जेटिनाला अंतिम फेरीत पोचविण्याचे संपूर्ण श्रेय गोलरक्षक सर्जियो रोमेरो याच्या वाट्याला जाते. त्याने पेनल्टीतील दोन शूटस सूरमारुन अडविले. अंतिम फेरीत अर्जेंटिनाला जर्मनीशी लढत द्यावयाची आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जर्मनीने यजमान ब्राझीलचा ७-१ गोलने लिलया पराभव केला होता. नेदरलॅण्डचा संघ पराभूत होताच त्यांचे विश्‍व करंडक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले.
पूर्वार्धातील ४५ मिनिटे, त्यानंतर उत्तरार्धातील ४५ मिनिटे अशा ९० मिनिटांच्या खेळात एकही गोल होवू शकला नाही. या सामन्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, त्या अर्जेटिनाच्या मेस्सी व नेदरलॅण्डच्या रोबेनवर. पण या दोघांनाही नेत्रदीपक कौशल्य सादर करण्यात यश मिळू शकले नाही. दोघांनाही गोल करण्याची संधी मिळाली होती.
९० मिनिटांच्या खेळात सामना ०-० ने बरोबरीत सुटताच अतिरिक्त १५-१५ अशा तीस मिनिटांचा खेळ झाला. पण त्यातही कोणताच संघ गोल करू शकला नव्हता. शेवटी पेनल्टी शूटआउट्‌सवर निकाल लावण्यात आला. त्यात अर्जेंटिनाचा गोलरक्षक रोमेरो याने नेदरलॅण्डचा ब्लारची किक सूर मारून अडविली. अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने पेनल्टीवर गोल करून अर्जेंटिनाला १-० आघाडीवर नेले. यानंतर नेदरलॅण्डचा स्नाईडर तिसरी किक मारण्यासाठी पुढे आला. पण त्याचाही चेंडू रोमेरोने अडवून कमालीची रक्षण केले. याच क्षणी अर्जेंटिना अंतिम फेरीच्या मार्गावर उभा ठाकला होता. शेवटी अर्जेंटिनाने ४-२ गोल फरकाने उपांत्य सामना जिंकून २४ वर्षांनंतर पुन्हा अंतिम फेरी गाठली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14123

Posted by on Jul 10 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2425 of 2479 articles)


ब्राझीलला दारून पराभव जिव्हारी लागला अध्यक्षांनाही दु:ख, चाहत्यांना भावना अनावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार साओ पाओलो, [९ जुलै] - ...

×