Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » चला गरिबीविरुद्ध लढूया

चला गरिबीविरुद्ध लढूया

=पंतप्रधान मोदींचे पाकला आवाहन=

कोझिकोड, [२४ सप्टेंबर] – भारत पाकिस्तानविरुद्ध लढाईला तयार आहे. पण पाकिस्तानी नागरिकांनो, तुम्हाला लढाई करायचीच असेल तर गरिबीशी करा, लढाई निरक्षरतेशी करा आणि बेरोजगारीशी करा. दोन्ही देशांनी आपापल्या देशातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे. या लढाईत कोण बाजी मारणार याचे उत्तर स्पष्ट आहे, भारतच ही लढाई जिंकणार आहे, असे प्रतिपादन नरेेंद्र पंतप्रधान मोदी यांनी केले.
कोझिकोड येथे शनिवारी झालेल्या प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधानांनी पाकला वरीलप्रमाणे आवाहन करीत भारताच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पाकने दारिद्र्य व बेकारीशी झुंजावे. पाकिस्तानी जनतेची तेथील राज्यकर्त्यांकडून तशीच अपेक्षा आहे. आम्ही सर्वच क्षेत्रात मागे का राहिलो, याचा जाब पाकी जनतेने आपल्या सरकारला विचारायलाच हवा, असेही मोदी यांनी नमूद केले.
केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यानी केलेल्या बलिदानाचा मोदी यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. केरळी जनतेच्या सेवाभावाची संपूर्ण जगात प्रशंसा केली जाते, असे मोदी म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी घालून दिलेल्या मार्गानेच आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून पाळले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
गरिबीमुक्त आणि समृद्धीयुक्त, भेदभावाने मुक्त आणि समानतेने युक्त, बेरोजगारीमुक्त आणि रोजगारयुुक्त, शिक्षितपणानेमुक्त आणि सुशिक्षितपणाने युक्त देश आम्हाला घडवायचा आहे, असे मोदी म्हणाले. शांती, एकता आणि सद्भावना हे आमच्या देशाचे भविष्य आहे, एका स्वरात आणि सुरात आम्ही आज बोलत आहोत आणि हीच आमची ताकद आहे, त्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही मोदी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29297

Posted by on Sep 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (94 of 2477 articles)


कोझिकोड, [२३ सप्टेंबर] - गरिबांच्या कल्याणाच्या योजनांवर भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या उद्यापासून कोझिकोड येथे होत असलेल्या बैठकीत व्यापक विचारमंथन होणार असल्याचे ...

×