Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » चीनसोबतच्या मैत्रीला प्राधान्य : पर्रीकर

चीनसोबतच्या मैत्रीला प्राधान्य : पर्रीकर

=लष्करी मुख्यालयात भव्य स्वागत=

बीजिंग, [१८ एप्रिल] – भारत आणि चीनमधील संबंध सुधारावे, यावरच आम्ही सातत्याने भर दिला आहे. आमच्यासाठी चीनसोबतची मैत्री महत्त्वाची आहे आणि या मैत्रीला आम्ही प्राधान्य दिले आहे, असे भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पर्रीकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. रविवारी शांघायहून बीजिंगमध्ये दाखल झाल्यानंतर पर्रीकर यांनी आज चिनी लष्कराच्या येथील मुख्यालयाला भेट दिली. यावेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पर्रीकर यांचे भव्य स्वागत केले. चीनचे संरक्षण मंत्री जनरल चांग वॉंकून यांच्यासोबत चर्चा करताना पर्रीकर म्हणाले की, चीनसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध सुधारण्यावर भारताने नेहमीच भर दिला आहे. यावेळी चांग वॉंकून यांनीही पर्रीकर यांच्याशी हस्तांदोलन करताना, तुमची पहिलीच चीन भेट आमच्यासाठी विशेष महत्त्वाची असल्याचे जाहीर केले. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील विश्‍वास यामुळे आणखी वृद्धींगत होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27893

Posted by on Apr 19 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (472 of 2483 articles)


चीनच्या दुटप्पी धोरणावर स्वराज संतापल्या दहशतवादाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील मॉस्को, [१८ एप्रिल] - पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा ...

×