Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांचे निधन

जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांचे निधन

Balraj-Madhokनवी दिल्ली, [२ मे] – माजी खासदार आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांचे आज सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९६ वर्षाचे होते. मधोक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले.
भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले मधोक गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी अ. भा. आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाले. मध्य दिल्लीच्या न्यू राजेंद्रनगर भागात असलेल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून बलराज मधोक यांच्या निधनाची माहिती दिली.
१९६१ आणि १९६७ मध्ये मधोक लोकसभेचे सदस्य होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही ते संस्थापक सदस्य होते. जनसंघाची घटना मधोक यांनी तयार केली होती. १९६८ मध्ये खासदार असताना हिंदू राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या मधोक यांनी रामजन्मभूमी हिंदूंकडे सोपविण्याची मागणी केली होती.
मधोक यांचा जन्म जम्मू-काश्मिरातील स्कार्दू भागात २५ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. ऑर्गनायझर आणि वीर अर्जुन साप्ताहिकातही त्यांनी काही काळ काम केले. नवी दिल्लीच्या पीजीडीएव्ही महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९५१ मध्ये जनसंघाचे समन्वयक आणि नंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम केले. १९६६ मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलराज मधोक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मधोक यांची वैचारिक निष्ठा ठाम होती, ते स्पष्ट विचाराचे होते, त्यांनी नि:स्वार्थ भावनेने देशासाठी आणि समाजासाठी स्वत:ला समर्पित केले होते, असे मोदी यांनी म्हटले. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनीही मधोक यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28134

Posted by on May 3 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (393 of 2477 articles)


=नाएला कादरी बलोच यांचे मत= नवी दिल्ली, [२ मे] - १९७१ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या प्रमाणे बांगलादेशची ...

×