Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » जयललिता भेटल्या पंतप्रधानांना

जयललिता भेटल्या पंतप्रधानांना

jayalalitha meets modiनवी दिल्ली, [१४ जून] – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज मंगळवारी राजधानी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सलग दुसर्‍यांना आरूढ झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे.
कावेरी व्यवस्थापन मंडळ तसेच जल नियामक समितीची स्थापना कण्यासह अन्य मागण्यांचे २९ पानांचे निवेदन त्यांनी यावेळी पंतप्रधानांना सादर केले. नद्यांच्या जोडणीसोबतच मुल्लापेरियार धरणातील पाण्याचा १५२ फुटाचा स्तर कायम ठेवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सोबतच, जीएसटी विधेयकातील ज्या तरतुदींना राज्य सरकारचा विरोध आहे, त्याचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यात यावे आणि कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा दुसरा टप्पा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली. तत्पूर्वी आज सकाळी जयललिता दिल्लीत आल्या. आपल्या पक्षातील खासदारांची भेट घेतल्यानंतर त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाल्या. सुमारे अर्धा तास त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28598

Posted by on Jun 15 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (238 of 2477 articles)


=‘ए लाईफ इन डिप्लोमसी’च्या प्रकाशनप्रसंगी रसगोत्र यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [१४ जून] - एनएसजीत भारताच्या प्रवेशाला आज चीनकडून होत असलेला ...

×