Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » जर्मनीतही पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’

जर्मनीतही पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’

=भारतात गुंतवणुकीसाठी या! :मोदी, मर्केल यांच्याशी ‘चाय पे चर्चा’=
Modi woos German investors1हॅन्नोवर, [१३ एप्रिल] – आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी जर्मनीतील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले. भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र करण्यासाठी नियमांमध्ये बदल करावे लागल्यास आपले सरकार आवश्यक तेव्हा ठोस पुढाकार घेत राहील, अशी हमी पंतप्रधानांनी येथील गुंतवणूकदारांना दिली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीच्या पंतप्रधान ऍन्जेला मर्केल यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ही केली.
भारतातील आधीचे वातावरण वेगळे होते. त्यामुळे जुनेच वातावरण अजूनही भारतात असेल, अशा संभ्रमात राहू नका. भारतात या, बदललेल्या स्थितीचा अनुभव घ्या आणि गुंतवणूक करण्याकरिता समोर या, असे मोदी यांनी येथे भारत-जर्मन व्यवसाय परिषदेचे उद्‌घाटन करताना सांगितले. या परिषदेत मोदी आणि जर्मनीच्या पंतप्रधान ऍन्जेला मर्केल यांनी संयुक्तपणे भारतीय पॅव्हेलियनचे उद्‌घाटन केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातील स्वागतगीताचे संगीत मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिले आहे.
‘मेक इन इंडिया’ ही आज काळाची गरज आहे. ही केवळ सरकारची योजना नसून, एक आंदोलन आहे. भारतात यापुढे उद्योग धोरणांमध्ये वारंवार बदल होणार नाहीत. आमच्या देशातील कायदेदेखील भारताला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र म्हणून विकसित करणारा हा प्रवास थांबवू शकणार नाही, असा मला पूर्ण विश्‍वास आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा भारतातील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक तिथे दुरुस्त्याही करण्यात येतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
भारतीय अर्थव्यवस्था आज संपूर्ण जगातच अतिशय झपाट्याने विकास करीत आहे. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारतातील युवकांची मागणीही जगभरात सातत्याने वाढत आहे. भारतात ज्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा फायदा जगाने घ्यावा आणि यशाचे नवे शिखर गाठावे. जगातील सर्वच आर्थिक मानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वाधिक गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था असे संबोधले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22030

Posted by on Apr 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1805 of 2483 articles)


=राजधानीत विधानमंडळ पदाधिकार्‍यांची बैठक= नवी दिल्ली, [१३ एप्रिल] - संसद आणि विधिमंडळात प्रश्‍नोत्तराचा तास नियमित व्हावा, त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय ...

×