Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » जर्मनी विश्वविजेता : बर्लिनमध्ये विजयोत्सव

जर्मनी विश्वविजेता : बर्लिनमध्ये विजयोत्सव

बर्लिन, [१४ जुलै] – गोत्झे याने खेळातील ११३ व्या मिनिटाला गोल करताच आणि विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रथमच दक्षिण अमेरिकेच्या भूमिवर युरोपमधील जर्मनीने प्रथमच करंडक पटकावताच जर्मनीत आनंदला उधाण आले. रात्र असल्याने विजयोत्सव करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक रस्त्यांवर गोळा झाले होते.
जर्मनीने १-० गोलने विश्‍व करंडक जिंकताच बर्लिन शहरात विजयोत्सवाला उधाण आले. लोक वाहनांचे आवाज वाजवून विजयोत्सव करू लागले. फटाक्यांची आतषबाजी रात्रभर सुरू होती. राजधानीत अडीच लाखावर लोक विजयोत्सवात डुंबून गेले होते. ऐतिहासिक विजय लोकांनी नाच गाणे गाउन, नृत्य करून मनसोक्त लुटला. बर्लिनच्या रस्यांवर सर्वत्र जर्मनीचा राष्ट्रध्वज झळकत होते. फुटबॉलप्रेमींनी विजयाचा मनमुराद आनंद लुटावा यासाठी काही रस्ते वातुकीसाठी बंद करण्यात आले होते. जणू राष्ट्रीय सण जाणवत होता. रात्रभर पार्टीच पार्टी झडत होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14148

Posted by on Jul 14 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2422 of 2479 articles)


२०१४ च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेचा नयनरम्य समारोप मर्केल, पुतीन यांची उपस्थिती रियो दी जानेरियो, [१३ जुलै] - गेल्या महिनाभरापासून ...

×