Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा,
नवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे.
या अध्यादेशाचा मसुदा सरकारतर्फे केंद्री गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून तो विधिमंत्रालयाकडे पाठविण्यात आला. आज सायंकाळी विधिमंत्रालयाने या अध्यादेशावर आपली स्वाक्षरी केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही तामिळनाडूत जलीकट्ठू उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधितज्ज्ञांचे मतही विचारात घेतले होते. आज सकाळी पत्रपरिषद आयोजित करून मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. जलीकट्टू सणाला राज्यात परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पशू कू्ररता प्रतिबंधक कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाच्या आवडीचा असलेला हा उत्सव याच  आठवड्यात साजरा होणार असल्याने नागरिकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने अध्यादेश जारी केल्यास त्याला केंद्राचे समर्थन मिळेल, अशी हमी मला पंतप्रधानांनी दिली आहे. त्यानंतर मी राज्यातील काही विधिज्ञांशी आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांसोबतही चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढील आठवड्यात
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही जलीकट्टूवर या आठवड्यात आपण कोणतीही सुनावणी करणार नसल्याचे स्पष्ट करताना, पुढील आठवड्यात निर्णय देणार असल्यो जाहीर केले. न्या. दीपक मिश्रा आणि न्या. आर. बानुमती यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, जलीकट्टू सणाबाबत तामिळनाडूतील जनता अतिशय उत्साहित आहे आणि न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे काम करीत आहे. यावर न्यायालयाने केवळ ‘ओके’ असे उद्‌गार काढले आणि पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29394

Posted by on Jan 21 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (72 of 2477 articles)


बंगळुरू, [२० जानेवारी] - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी ...

×