Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जवानांची रणनीती अभूतपूर्वच

जवानांची रणनीती अभूतपूर्वच

=पठाणकोट वायुसेनेच्या तळाला पंतप्रधानांची भेट=
pm-narendra-modi_at pathankot airbaseपठाणकोट, [९ जानेवारी] – पंजाबच्या पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर गेल्या शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी वायुसेनेच्या हवाईतळाला भेट दिली. यावेळी हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी पंतप्रधानांना दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि तो परतावून लावण्यासाठी जवानांनी आखलेली रणनीती याबाबतची सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या वायुसेनेच्या या हवाईतळावर पंतप्रधान तब्बल दीड तास होते. अरुप राहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत एनएसजीचे वरिष्ठ कमांडोही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी या परिसराची व बामियाल येथील सीमा क्षेत्राचीही हवाई पाहणी करून, प्रत्यक्ष झालेला हल्ला आणि तो परतावून लावण्यासाठी जवानांनी आखलेली रणनीती समजून घेतली.
अतिरेक्यांनी घुसखोरी करताच, त्यांना थोपवून धरून, वायुसेनेच्या तळाचे रक्षण करण्यासाठी जवानांनी दाखविलेले धाडस आणि आखलेली रणनीती अभूतपूर्व अशीच होती. हे बहादूर जवान देशाचा गौरव आहेत. या परिसरात वायुसेनेचे जवान आपल्या परिवारांसह राहतात. त्यांच्याही प्राणांचे त्यांनी रक्षण केले, असे पंतप्रधानांनी येथील भेटीनंतर ट्विट केले.
या काळात मोदी यांनी वायुसेना तळावरील ज्या-ज्या भागांमध्ये अतिरेक्यांनी हल्ले केले, त्या सर्व ठिकाणांचीही पाहणी केली. सलग तीन दिवस चाललेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी स्वत:सोबत आणलेला शस्त्र व स्फोटकांचा साठाही त्यांना दाखविण्यात आला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास जिथे पहिली चकमक झडली होती, त्या मिल्ट्री इंजीनिअरिंग सर्व्हिस यार्डला, जिथे शेवटचा अतिरेकी मारला गेला त्या एअरमन ऍकोमोडेशन परिसरालाही पंतप्रधानांनी भेट दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26461

Posted by on Jan 10 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (929 of 2477 articles)


इस्लामाबाद, [९ जानेवारी] - भारत-पाकिस्तान चर्चेत कोणत्याही अतिरेकी संघटनेला वितुष्ट आणण्याची परवानगी नाही, असा कडक इशारा पाकचे संरक्षण मंत्री ...

×