Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » जिनपिंग यांच्या गावी मोदीमोदीचा गजर

जिनपिंग यांच्या गावी मोदीमोदीचा गजर

Prime Minister Narendra Modi interacting with the people near the Daxingshan Temple in China2शियान, [१४ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या चीन दौर्‍यासाठी आज गुरुवारी पहाटे येथे आगमन झाले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एवढेच नव्हे तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या गृहनगरात मोदींचे आगमन झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि रस्त्यांवर मोदी…मोदीचा गजर ऐकू आला.
शियान येथे आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राचीन दाशिक शान बौद्ध मंदिरात दर्शन घेतले व तेथून ते बाहेर आल्यानंतर हे दृश्य बघायला मिळाले. पंतप्रधानांचा मुक्काम असलेल्या हॉटेलपासून ते या मंदिरापर्यंतच्या प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक मोदींना बघण्यासाठी आतूर झाले होते. पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा अचानक एका चौकात थांबला आणि चिनी पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आपल्या वाहनातून खाली उतरले आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांना त्यांनी अभिवादन केले. पंतप्रधान मोदी लोकांमध्ये मिसळले आणि त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. लोकांच्या हाती असलेल्या मोबाईलमध्ये पंतप्रधानांचे छायाचित्र कैद होत होते आणि मोदी सुरक्षेची काळजी न करता अगदी सहजपणे त्यांच्यात मिसळत होते.
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचे गृहनगर असलेल्या शियान येथील लोकांना मोदींनी अक्षरश: वेड लावले होते. सुमारे पंधरा मिनिटे सुरक्षा रक्षकांच्या घेर्‍यातून बाहेर राहून मोदींनी सामान्यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी कारमध्ये परतल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. पंतप्रधान मोदींचा ताफा पुढे सरकत असताना हजारो लोक हात हलवून त्यांना अभिवादन करताना दिसत होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22559

Posted by on May 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1704 of 2483 articles)


=देशभरात १०० सभा करणार, पंतप्रधान, मंत्र्यांचे संबोधन= नवी दिल्ली, [१४ मे] - गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक जनादेशासह सत्तेत ...

×