Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » डीएसयु निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय

डीएसयु निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय

  • सलग दुसर्‍या वर्षी चारही जागा जिंकल्या
  • ‘आप’च्या छात्र युवा संघर्ष समितीची धूळधाण

delhi univercity electionनवी दिल्ली, [१२ सप्टेंबर] – दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चारही जागा जिंकत सलग दुसर्‍या वर्षी आपला झेंडा फडकवला आहे. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीची विद्यार्थी संघटना, छात्र युवा संघर्ष समितीची धूळधाण उडवत अभाविपने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. एनएसयुआयला दुसर्‍या स्थानावर समाधान मनावे लागले.
दिल्लीत आपची सत्ता आल्यामुळे यावर्षी या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण आपसह सर्व राजकीय पक्ष रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही आणि अभाविपचे सर्व उमेदवार विजयी झाले. अध्यक्षपदी सतिंदर अवाना विजयी झाला. उपाध्यक्षपदी सन्नी देढा, सचिवपदी अंजली राणा आणि सहसचिवपदी छतरपाल यादव हे निवडून आले. छात्र युवा संघर्ष समितीला या निवडणुकीत तिसरे स्थान मिळाले. एनएसयुआय दुसर्‍या स्थानावर राहिली.
आज शनिवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, फटाके फोडले, गुलाल उधळला, मिठाई वाटली. दिल्ली विधानसभेत मिळालेल्या विजयानंतर आपने छात्र युवा संघर्ष समिती ही विद्यार्थी आघाडी स्थापन करत या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. मात्र, दिल्लीतील विद्यार्थ्यांनी आपला नाकारत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. दिल्ली विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात ७० महाविद्यालये असून, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत ५० महाविद्यालयांच्या १ लाख ३५ हजार २९८ विद्यार्थ्यांना मताधिकार होता. त्यापैकी ४३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अध्यक्षपदी निवडून आलेले सतिंदर अवाना यांना २०४३९ मते मिळाली. त्यांनी एनएसयुआयचे प्रदीप विजयआर्यन यांचा सहा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सनी देढा यांनी छात्र युवा संघर्ष समितीच्या गरिमा राणा यांना ७५७० हजार मतांनी पराभूत केले. सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत अभविपच्या अंजली राणा यांनी एनएसयुआयच्या अमित सेहरावत यांचा ४६१० मतांनी पराभव केला. सहसचिवपदाच्या निवडणुकीत अभाविपचे छतरपाल यादव यांनी एनएसयुआयच्या दीपक चौधरी यांना ६०६५ मतांनी हरवले.
अभाविपच्या विजयी उमेदवारांचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23780

Posted by on Sep 13 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1485 of 2477 articles)


=भारतीय सैनिकांचा दणका, सीमेवर तणाव= नवी दिल्ली, [१२ सप्टेंबर] - लडाखमधील नियंत्रण रेषेवर चीनने उभारलेले अवैध वॉच टॉवर भारतीय सैनिकांनी ...

×