Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर आंतरराष्ट्रीय स्मारक

डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर आंतरराष्ट्रीय स्मारक

=राज्य सरकारचा निर्णय=
dr. ambedkar's house in londonमुंबई, [३ फेब्रुवारी] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर खरेदी करून, ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून, जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांनी १९२१-२२ या कालावधीत लंडन येथील १०, किंग्ज हेन्री रोड, एनडब्ल्यू ३ या घरात वास्तव्य केले होते. या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून ‘डीएस्ससी इन इकॉनॉमिक्स’ आणि ग्रेझ इन या संस्थेतून ‘बार ऍट लॉ’ या पदव्या संपादित केल्या. तसेच या वास्तव्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण संशोधनही केले होते. डॉ. आंबेडकरांसारख्या महापुरुषाच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या आठवणी या घराशी जुळल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. या ऐतिहासिक वैशिष्ट्यांमुळे हे घर राज्य शासन खरेदी करणार आहे.
घर खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव आहेत. खरेदीची ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. डॉ. आंबेडकरांचे घर राज्य सरकारने खरेदी करावे, यासंदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या लंडन येथील दौर्‍यादरम्यान पुढाकार घेतला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20285

Posted by on Feb 4 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2132 of 2476 articles)


नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - रेल्वेप्रवासादरम्यान मिळणार्‍या भोजनाच्या दर्जाविषयी बरेचदा प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यात कधी अळ्या, तर कधी झुरळ ...

×