Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप

kalam1-laststoryरामेश्वरम, [३० जुलै,] – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना रामेश्वर येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यंत शोकाकुल वातावरणात आज गुरूवारी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांसह लाखो लोक यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. कलाम यांना अखेरचा सलाम केला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्याचबरोबर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली. कलाम यांच्या मुळ गावी लाखोंचा जनसागर लोटला होता.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कलाम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठया संख्येने लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
दोन दिवसांपूर्वी शिलॉंगमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने डॉ. कलाम यांचं निधन झाले होत. डॉ. कलाम यांच्या निधनाने देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23572

Posted by on Jul 30 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1538 of 2477 articles)


रामेश्‍वरम् येथे उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार राजशिष्टाचार त्यागून राष्ट्रपती, पंतप्रधान विमानतळावर नवी दिल्ली, [२८ जुलै] - भारताचे माजी राष्ट्रपती, ...

×