Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ कलामांच्या अंत्यदर्शनाला मान्यवरांची गर्दी

डॉ कलामांच्या अंत्यदर्शनाला मान्यवरांची गर्दी

pranabmukherjee_kalamनवी दिल्ली, [२८ जुलै] – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव आज मंगळवारी दुपारी दिल्लीतील पालम विमानतळावर विशेष विमानाने आणले आहे. पार्थिव दिल्लीत आणल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लष्करातर्फे यावेळी मानवंदनाही देण्यात आली.
आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने कलाम यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. तिरंग्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव लष्करी अधिकार्‍यांनी विमानातून बाहेर आणल्यानंतर सेनादलाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत दिल्ली विमानतळावर डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर कलाम यांचे पार्थिव दिल्लीतील १०, राजाजी मार्गावरील त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेण्यात आले आहे. तेथे तीन वाजेपासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. तिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23544

Posted by on Jul 29 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1545 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२८ जुलै] - जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या सीमेवरून होणार्‍या अतिरेकी कारावायांवर आळा घालत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध निर्माण ...

×