Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » डॉ स्वामी, सिद्धू, मेरी कोम, डॉ जाधव राज्यसभेवर

डॉ स्वामी, सिद्धू, मेरी कोम, डॉ जाधव राज्यसभेवर

Swamy_Sidhu_Mary-Kom_jadhav_sureshgopi_Swapan-Dasgupta_Rajya-Sabha-MPSनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – राज्यसभेतील नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सत्ताधारी भाजपाने सुरू केली असून, यासाठी काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्‍वसनीय सूत्राने सांगितले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्याआधी या नियुक्त्या केल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्यसभेत नामनियुक्त सदस्यांच्या एकूण १२ जागा असतात, त्यातील ७ जागा सध्या रिक्त आहेत. या जागांसाठी भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू, मल्याळम अभिनेता सुरेश गोपी, ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची नावे निश्‍चित केली असल्याचे समजते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नावांना मंजुरी दिली असल्याचीही माहिती आहे. सरकारतर्फे या सहा नावांची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. फक्त या लोकांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणे सध्या बाकी आहे.
सातपैकी सहा जणांची भाजपाने राज्यसभेवर निवड केली असून, फक्त एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. चित्रपट अभिनेते अनुपम खेर आणि आपकी अदालतमुळे गाजलेले टीव्ही पत्रकार रजत शर्मा यांच्या नावाचीही भाजपा वर्तुळात चर्चा आहे. यातील एकाची राज्यसभेवर निवड होईल, असा अंदाज आहे. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेत भाजपाच्या खासदार आहेत.
सुब्रमण्यम स्वामी गांधी घराण्याचे कट्टर विरोधक असून वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहात असतात. पुढील वर्षी होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाचा विचार झाला असल्याचे समजते. सिद्धू यांच्या पत्नी पंजाबमध्ये भाजपाच्या आमदार आहेत.
या सात नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीमुळे राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ काही प्रमाणात वाढणार आहे. सध्या राज्यसभेत भाजपा अल्पमतात आहे. पण आता अनेक महत्त्वपूर्ण विधेयके पारित करणे भाजपाला शक्य होणार आहे.
सध्या राज्यसभेत माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, चित्रपट अभिनेत्री रेखा, अनु आगा, ज्येष्ठ विधिज्ञ के. पारासरन आणि के. टी. एस. तुलसी असे पाच नामनियुक्त सदस्य आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27955

Posted by on Apr 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (449 of 2477 articles)


=मसूद प्रकरणाचे पडसाद= बीजिंग, [२२ एप्रिल] - ‘ठकासी व्हावे महाठक’ या उक्तीनुसार केंद्रातील मोदी सरकारने वर्ल्ड उईगर कॉंग्रेसचा (डब्ल्यूयूसी) कथित ...

×