Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मानस : पंतप्रधान

तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मानस : पंतप्रधान

  • ‘स्टार्ट अप इंडिया’चा शुभारंभ
  • १० हजार कोटींच्या निधीची घोषणा
  • अटल इनोव्हेशन मिशन गठित

start up india narendra modi, jaitly, nirmala sitaramanनवी दिल्ली, [१६ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी महत्त्वाकांक्षी अशा ‘स्टार्ट अप इंडिया’ अभियानाचा येथील विज्ञान भवनात प्रारंभ केला. देश-विदेशातील अनेक उद्योगांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी हे अभियान पूर्णपणे यशस्वी करण्याचा आणि देशातील लाखो तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मानस व्यक्त केला. याचवेळी १० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. वार्षिक २००५ कोटी अशा प्रकारे हा निधी उभारला जाणार आहे.
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना या अभियानाची मी घोषणा केली होती. त्यानंतरचा काळ असाच गेला. आता हे अभियान प्रत्यक्ष अस्तित्वात आले आहे. हे अभियान देशाला खर्‍या अर्थाने समोर नेणारे ठरेल, असा विश्‍वास आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या अभियानासाठी आपल्या सरकारने ‘सेल्फ सर्टिफिकेट सिस्टीम’ सुरू केले. लवकरच मोबाईल ऍप आणि पोर्टलही सुरू होणार आहे. स्टार्ट अपसाठी अतिशय साधारण फॉर्म असेल. त्याद्वारे नोंदणी करणे फारच सोपे काम राहील. स्टार्ट अपच्या तपासणीसाठी तीन वर्षेपर्यंत कोणताही अधिकारी येणार नाही, असे सांगताना, स्टार्ट अप पेटेंटच्या शुल्कात ८० टक्के कपात केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. अपयश येऊनही जो समोर येण्याचे धाडस करेल, त्याला मी प्रोत्साहन देणार आहे. कारण, पाण्यापासून पळ काढणारा कधीच पोहणे शिकू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्टार्ट अपच्या सार्वजनिक खरेदीतून सूट देतानाच, यासाठी तीन वर्षांपर्यंत आयकरातूनही सूट दिली जाईल, असे जाहीर करताना, अटल इनोव्हेशन मिशनची घोषणाही त्यांनी केली.
गेल्या ७० वर्षांत आपण आतापर्यंत खुप काही केले. पण, आपण कुठे आलो आहोत? त्यामुळे सरकारने आता काय करावे, त्यापेक्षा काय करायला नको, हे तुम्ही सांगा, असे हसतच नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येकांच्याच मनात एक स्वप्न असते, विचार असतात. आपल्या कल्पनांमध्ये गुंतलेले आणि त्याच विश्‍वास वावरणारे लोक फारच कमी असतात. त्याच्यामुळे घरातील सदस्य त्रस्त असतात. पण, तोच मुलगा एक दिवस कमाल करतो. प्रत्येकांनाच एक विशिष्ट सुरुवात करण्याची आवश्यकता असते. ‘स्टार्ट अप’ हा त्याचाच एक भाग आहे. सुरुवात केल्याशिवाय समोर जाता येत नाही. आपल्यापैकी प्रत्येकांचा हाच अनुभव असणार. जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. जोखीम घेतल्यानंतरच आपण जगाला काही तरी देऊ शकणार आहोत.
‘स्टार्ट अप इंडिया’ अभियान आज मी देशवासीयांना समर्पित करीत आहो. ते पुढे नेण्याचा माझा निर्धार असल्याने देशवासीयांकडून विशेषत: उद्योजकांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या सर्वांच्याच सहकार्याने हे अभियान समोर जाणार आहे आणि यशस्वी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनुकूल करप्रणाली : जेटली
तत्पूर्वी, याच कार्यक्रमात बोलताना बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याकरिता आगामी अर्थसंकल्पात ‘स्टार्ट अप’ कंपन्यांना अनुकूल करप्रणाली राबवली जाईल आणि ‘स्टार्ट अप’साठी परवानगी देताना ‘लायसन्स-राज’ होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने सरकार बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढविणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी क्रेडिटमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार उद्योजकांना परिपूर्ण मदत करेल, असेही जेटली म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26545

Posted by on Jan 17 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (902 of 2477 articles)


हिंगोली, [१६ जानेवारी] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी गुणवान व्यक्ती घडविण्याचे कार्य करीत आहेत. समाजास शिक्षित ...

×