तीन अनिवासी भारतीयांना ‘इंटेल’ पदकं
Thursday, March 12th, 2015वॉशिंग्टन, [११ मार्च] – प्रतिष्ठित ‘इंटेल सायन्स टॅलेंट सर्च २०१५’ मध्ये तीन भारतीय वंशाच्या अमेरिकन युवकांनी बाजी मारली आहे. त्यांना आज व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपती बराक ओबामांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. सरन प्रेमबाबू, शश्वत किशोर आणि अन्विता गुप्ता या तिघांनी इंटेलतर्फे झालेल्या या स्पर्धेत पदक पटकावले आहे. मात्र, तिघांपैकी कुणीही सर्वोच्च पुरस्कार जिंकू शकले नाही. आयोजकांनी सांगितले की, मुख्य पुरस्कार नोह गोवाविच, एंड्र्यिू जिन आणि मायकल हाफ वायनर यांनी प्राप्त केला आहे. या सर्वांना प्रत्येकी एक लाख ५० हजार डॉलर्स (जवळजवळ ९४ लाख २१ हजार रुपये) मिळाले. आयोजकांनी सांगितले की, संपूर्ण अमेरिकेतून सर्वोच्च विजेते आणि अंतिम फेरीत पोहोचणार्यांनी एकूण १० लाख अमेरिकन डॉलरहून अधिक किमतीचे पुरस्कार पटकावले आहेत. कॅलिफोर्नियाच्या सेन रेमनच्या सरन प्रेमबाबू (१७) याने ‘डिस्टिंक्शन ऑफ इनोवेशन’ मध्ये ‘सेकंड प्लेस मेडल’ पटकावले. वेस्ट चेस्टरच्या पेन्सिल्वेनियाचा शश्वत किशोर (१८) ला ‘डिस्टिंक्शन फॉर बेसिक रीसर्च’ मध्ये पदक मिळाले आहे. तर ऍरिझोनाच्या अन्विता गुप्ता (१७) हिने ‘डिस्टिंक्शन फॉर ग्लोबल गुड’ या विषयात पदक प्राप्त केले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21271

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!