Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » तीन वैज्ञानिकांना रसायनशास्त्राचे नोबेल

तीन वैज्ञानिकांना रसायनशास्त्राचे नोबेल

nobel-prize-chemistry-2015स्टॉकहोम, [७ ऑक्टोबर] – डीएनएमधील दुरुस्तीबद्दल स्वीडनचे टॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉडरिच आणि अमेरिकन वंशाचे तुर्कीचे वैज्ञानिक अजीझ सँकार या त्रिकुटाला रसायशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेसने या पुरस्कारांची घोषणा केली. या वैज्ञानिकांच्या शोधकार्यामुळे जिवंत पेशी कशा पद्धतीने कार्य करतात याचे मूलभूत ज्ञान उपलब्ध झाले आहे. इतर गोष्टींशिवाय कर्करोगावर नवी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे, असे पुरस्काराची घोषणा करताना सांगण्यात आले.
७७ वर्षीय लिंडार हे ब्रिटनमधील क्लेअर हॉल लेबॉरेटरीत कार्यरत आहेत. १९४६ मध्ये जन्मलेले मॉडरिच सध्या हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये तपासक आणि नॉर्थ कॅरोलिनाच्या डरहॅम येथील ड्युक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. ६९ वर्षीय सँकार हे चॅपेल हिल युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिन येथे प्रोफेसर आहेत.
ज्यांच्या नावाने हा पुरस्कार स्थापन झाला आहे त्या आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबरला नोबेल पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या त्रिकुटाला नोबेल पुरस्कारासह आठ दशलक्ष स्वीडिश क्रोनोर (सुमारे ९.६० लाख अमेरिकन डॉलर्स) प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षीचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जपान, अमेरिका व चीनच्या वैैज्ञानिकांना घोषित झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25034

Posted by on Oct 8 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1369 of 2483 articles)


नवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] - भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योतसिंग सिध्दू यांना काल मंगळवारी रात्री दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालयात ...

×