Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » दहशतवादाला कोणत्याही देशाने थारा देऊ नये

दहशतवादाला कोणत्याही देशाने थारा देऊ नये

=पंतप्रधान मोदी यांची भूमिका=
pm modi at East Asia Summit talked with indian cumunityक्वालालाम्पूर, [२२ नोव्हेंबर] – इसिसच्या वाढत्या क्रौर्यामुळे दहशतवाद जगापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे स्पष्ट करताना दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. जगाच्या पाठीवरील कोणताही देश दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरायला नको, असा चिमटाही त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख न करता काढला.
मलेशिया दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी केंद्रात हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद्यांविरोधात जागतिक लढा उभारण्याची गरज आहे. इसिस या जहाल संघटनेने इंटरनेटच्या माध्यमातून अतिरेक्यांची भरती सुरू केली आहे. इंटरनेट हा अतिरेक्यांच्या भरतीचे माध्यम ठरायलाच नको.
विविधतेत एकता हीच भारताची खरी शक्ती आहे. या देशात राहणार्‍या प्रत्येकाला हक्काचे घर, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छ वातावरण मिळावे, अशी स्थिती निर्माण करण्यावर, तसेच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी उद्योगांची भरभराट करण्यावर आपल्या सरकारने भर दिला आहे. जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाने आता प्रचंड गती पकडली आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्के या गतीने विकास करीत आहे, असेही पंतप्रधानांनी आपल्या सुमारे पाऊण तासाच्या भाषणात सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25649

Posted by on Nov 23 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1189 of 2483 articles)


=रशिया, फ्रान्सचे इसिसवर हल्ले, १५ तेल विहिरी, तेलाचे ५२३ ट्रक्सही उद्‌ध्वस्त= मॉस्को, [२१ नोव्हेंबर] - पॅरिस हल्ला आणि रशियाचे विमान ...

×