Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » दहशतवादाविरोधात जगाने एकत्र यावे

दहशतवादाविरोधात जगाने एकत्र यावे

  • ब्रिक्स’ बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
  • पॅरिस हल्ला चिंताजनक

MODI AT TURKY for G20 Summit 2015अंटालिया, [१५ नोव्हेंबर] – फ्रान्सची राजधानी पॅरिसवर शनिवारी झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध करून, दहशतवादविरोधात आणखी आक्रमक लढा देण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे नमूद केली. दहशतवाद समूळ नष्ट करण्यावर भारताने नेहमीच भर दिला आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा लढत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
अंटालिया येथे आज रविवारपासून ‘जी-२०’ राष्ट्रसमूहाच्या शिखर बैठकीला सुरुवात झाली. त्याआधी ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरोधात जगाने संघटित होण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा आपण सर्वांनीच सामूहिकपणे निषेध करायला हवा. हा हल्ला मानवतेविरोधात आहे आणि मानवतेच्या या शत्रूंना कायमची अद्दल घडविण्यासाठी सर्वच देशांनी एकत्र यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, पुढील वर्षी फेबु्रवारीत ‘ब्रिक्स’ समूहाचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे. दहशतवादाला कायमचा पायबंद घालण्यासाठीच भारत ‘ब्रिक्स’च्या अध्यक्षपदाचा प्रभावीपणे वापर करणार आहे. ब्रिक्स समुहातील प्रत्येक देशाला या लढ्यात मोठे योगदान द्यावे लागणार आहे. आपल्याला प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा आणि ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष दिलमा रौसेफ हे देखील उपस्थित होते. रशिया, अंकारा, बैरूत आणि आता जपानवरही मोठा दहशतवादी हल्ला झाला असल्याने दहशतवाद ही कोणत्या एका देशाची नसून, जागतिक समस्या झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पॅरिस हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कीच्या अंटालिया शहरात ‘जी-२०’ राष्ट्रसमुहाची बैठक सुरू झाली असल्याने शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, शहरातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरात येणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. बैठकीच्या स्थळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25481

Posted by on Nov 16 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1241 of 2483 articles)


तपासातील निष्कर्ष कन्सर्ट हॉलमधील अतिरेक्याची ओळख पटली तीन संशयितांना अटक पॅरीस, [१५ नोव्हेंबर] - १२९ नागरिकांचे बळी घेणार्‍या पॅरीसवरील ...

×