Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या!

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या!

=केजरीवालांची पंतप्रधानांकडे मागणी=
modi-kejriनवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – राष्ट्रीय राजधानी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करताना त्यांना चहासाठी निमंत्रित केले होते. त्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल आणि आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया मोदींच्या भेटीसाठी गुरुवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ७, रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहर्‍यावर हास्य दिसत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून दिल्लीचा विकास करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. अरविंद केजरीवाल शनिवार १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना या समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. परंतु, त्यादिवशी बारामती येथे आपला कार्यक्रम आधीच निश्‍चित असल्याने हजर राहता येणार नाही, असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.
पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल पत्रकारांशी संवाद न साधता निघून गेले. मात्र, सिसोदिया यांनी या भेटीबाबत पत्रकारांना माहिती दिली. आता केंद्र आणि दिल्लीत स्पष्ट बहुमताचे सरकार असल्याने दिल्लीचा विकास करण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात काहीच अडचण नाही, असे आम्ही पंतप्रधानांना सांगितले. त्यावर विचार करू, असे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिल्याचे सिसोदिया यावेळी म्हणाले. दिल्लीच्या विकासात शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन पंतप्रधानांनी केजरीवाल यांना दिले, असेही सिसोदिया यांनी सांगितले. संपूर्ण देशाचे लक्ष मोदी-केजरीवाल भेटीकडे लागले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20531

Posted by on Feb 13 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2074 of 2477 articles)


नवी दिल्ली/मुंबई/अहमदाबाद, [१२ फेब्रुवारी] - २००२ च्या गुजरात दंगल पीडितांना मदतीच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या ...

×