Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » देशांतर्गत उत्पादनाला चालना देणार : पंतप्रधान

देशांतर्गत उत्पादनाला चालना देणार : पंतप्रधान

  • संरक्षण क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात
  • एरो इंडियाचे थाटात उद्‌घाटन

Prime Minister Narendra Modi watching the Aero India-2015 Air Show, in Bangalore on February 18, 2015बंगळुरू, [१८ फेब्रुवारी] – संरक्षण उत्पादन क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत लवकरच एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. येथे आयोजित एरो इंडियाचे उद्‌घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते.
केंद्र सरकार देशांतर्गत आणि परदेशी उत्पादकांसाठी पक्षपातरहित करप्रणालीसह पोषक व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, आज देशाच्या सुरक्षेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेता आपली संरक्षण सिद्धता वाढविण्याची आणि सैन्यदलांना आधुनिक करण्याची गरज आहे. त्यामुळे विदेशी कंपन्यांनी फक्त विक्रेते होण्यापर्यंत न थांबता भारताचे सामरिक भागीदार व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारच्या मेक इन इंडिया या योजनेचा भाग म्हणून आयात कमी करून देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्यावर आमचा भर आहे आणि हाच या योजनेचा गाभा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आम्ही असे उद्योग क्षेत्र तयार करू ज्यामध्ये सार्वजनिक उपक्रम, खाजगी क्षेत्र आणि विदेशी कंपन्या अशा सर्वांना वाव असेल. शक्तिशाली संरक्षण उद्योग विकसित करण्याचा आमचा हेतू आहे. शक्तिशाली संरक्षण उद्योगामुळे देशाची सुरक्षा सुनिश्‍चित होण्यासह भरभराटही होणार आहे. यासाठी आमच्या येथील कर रचनेने देशांतर्गत उत्पादक आणि आयातक असा भेदभाव करायला नको, असे शहराच्या सीमावर्ती भागातील येलाहांका हवाई तळावर सुरू झालेल्या या आशियातील सर्वात महत्त्वाच्या शोच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले. जर देशातील उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्यात आम्हाला यश आले तर भारताचा संरक्षण उद्योगही यशस्वी होऊ शकतो. आयात कमी करण्यावर भर देताना मोदी म्हणाले की, देशांतर्गत उत्पादन खरेदी करण्याचे सध्या असलेले ४० टक्के हे प्रमाण पुढील पाच वर्षात ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यश आल्यास यामुळे संरक्षण उत्पादनातही दुपटीने वाढ होऊ शकते. एवढेच नव्हे, तर आयातीत २० ते २५ टक्के घट झाल्यास देशात एक ते एक लाख २० हजार उच्चकौशल्यप्राप्त रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असेही मोदी म्हणाले. संशोधन आणि विकास क्षेत्रात देशातील शास्त्रज्ञ, सैनिक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगक आणि स्वतंत्र तज्ज्ञांना सामील करून घेण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20699

Posted by on Feb 19 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (2049 of 2477 articles)


पुरावे सादर करणार : पर्रिकर तटरक्षक दलाच्या डीआयजींना नोटीस नवी दिल्ली, [१८ फेब्रुवारी] - गुजरातच्या पोरबंदर येथील समुद्रात भारताच्या ...

×