Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशात धावली पहिली ‘सीएनजी’ ट्रेन !

देशात धावली पहिली ‘सीएनजी’ ट्रेन !

cng_trainनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – देशातील पहिली इको फेंरडली ट्रेनचं काल मंगळवारी मोठया थाटामाटात उद्द्याटन करण्यात आलंय. सीएनजी रेल्वे काल रेवाडी ते रोहतक दरम्यान धावली. या रेल्वेमुळे पर्यावरणाबरोबरच रेल्वेवरचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल या पहिल्या सीएनजी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
इंधनाच्या या नव्या पर्यायामुळे रेल्वे खर्चात सुमारे ५० टक्क्यांची कपात होणार असा अंदाज आहे.चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत या सीएनजी रेल्वेची निर्मिती झाली आहे. डिझेलवर चालणार्‍या या रेल्वेत सीएनजीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वे डिझेल आणि सीएनजी अशा दोन्हींच्या मदतीने धावणार आहे. यामुळे विषारी वायुंची निर्मिती कमी होईल. तर कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण तब्बल ९० टक्क्यांनी कमी होईल. सुरूवातीला ही रेल्वे रोज २० किलोमीटर धावणार आहे, जर ही रेल्वे सीएनजीवर यशस्वीपणे चालवता आली तर इतर रेल्वेसाठीही सीएनजीचा वापर करता येईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19725

Posted by on Jan 15 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2238 of 2477 articles)


=श्रीश्री रविशंकर यांची मागणी= नाशिक, [१४ जानेवारी] - यावर्षी येथे होणारा कुंभमेळा पाहता तत्पूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी स्वच्छ ...

×