Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, १० ठार

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, १० ठार

argentina-helicopter-crashब्युनोस आयर्स, [१० मार्च] – ‘युरोपियन रिऍलिटी शो’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी आकाशात झेपावलेल्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर झाली. या भीषण अपघातात फान्सच्या दोन ऑलिम्पिकपटूंसह १० जण जागीच ठार झाले. वायव्य अर्जेन्टिनात सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला.
ला रिओजा प्रांतातील व्हिला कॅस्टेली भागात दोन्ही हेलिकॉप्टर्समधून हे चित्रीकरण सुरू असताना हवेतच त्यांची टक्कर झाली. ठार झालेल्यांमध्ये फ्रान्सचे आठ आणि अर्जेंटिनाचे दोन नागरिक आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकार्‍याने दिली. फ्रान्सची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जलतरणपटू कॅमिली मफत आणि मुष्ठियोद्धा ऍलेक्सिस वेस्टाईन यांच्यासह काही टीव्ही कलावंतांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
दुर्घटनेच्या वेळी हवामान स्वच्छ होते. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फान्समधील ‘टीएफ-१’ या टीव्ही वाहिनीसाठी हे चित्रीकरण करण्यात येत होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21248

Posted by on Mar 11 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1957 of 2483 articles)


=चार वरिष्ठ नेत्यांचा आरोप, राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी होणार= नवी दिल्ली, [१० मार्च] - योगेंद्र यादव, शांतिभूषण आणि प्रशांतभूषण यांनी दिल्ली ...

×