Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ‘द स्पॉटलाइट’ ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘द स्पॉटलाइट’ ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट

spolight_cast_press_room-oscarकॅलिफोर्निया, [२९ फेब्रुवारी] – कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हॉलीवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘८८वा ऑस्कर पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात द रेव्हनंट, स्पॉटलाईट आणि मॅड मॅक्स फ्युरी रोड या चित्रपटांनी बाजी मारली.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘स्पॉटलाईट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. तर लिओनार्डो दी कॅप्रिओ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ब्री लार्सन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘द रेव्हनंट’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने देण्यात आली होती. या सोहळ्यात भारतीय वंशाचे दिग्दर्शक आसिफ कपाडिया यांना ‘एमी’ साठी सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड मिळाला आहे. हा अवॉर्ड ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम देव पटेलने प्रेजेंट केला.
या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. ख्रिस रॉक यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26949

Posted by on Feb 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (798 of 2483 articles)


=शेतकरी, गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता= नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या सोमवारी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीच ...

×