Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » नरेंद्र मोदी ‘रिफॉर्मर इन चीफ’

नरेंद्र मोदी ‘रिफॉर्मर इन चीफ’

=ओबामांची स्तुतिसुमने, टाईममध्ये लिहिला विशेष लेख=
modi-obama1नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘रिफॉर्मर इन चीफ’ आहेत, या शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.
टाईम या विश्‍वविख्यात नियतकालिकात प्रकाशित विशेष लेखात बराक ओबामा यांनी आर्थिक सुधारणांसाठी पुढाकार घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरिबी दूर करण्यावर भर दिला आहे. भारताला गरिबीच्या अभिशापातून मुक्त करण्यासाठी ते चांगले प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आधी चहा विकून कुटुंबाला पुढे नेले आणि आता ते देशाला पुढे नेत आहेत. याशिवाय डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक भारत घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ओबामा यांनी या लेखात नमूद केले आहे.
जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी टाईमने नुकतीच प्रकाशित केली. त्या पार्श्‍वभूमीवर ओबामा यांनी हा लेख लिहिला आहे. लहानपणी चहा विकणारे नरेंद्र मोदी आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे प्रमुख आहेत आणि एक गरीब तरुण ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासातून भारताचा जोश आणि क्षमता दिसून येते. मोदी जेव्हा वॉशिंग्टनला आले होते तेव्हा त्यांच्यासोबत मी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या स्मारकावर गेलो होतो. त्यावेळी आम्ही महात्मा गांधी आणि किंग यांच्या शिकवणीची आठवण केली. आज एक अब्जपेक्षा जास्त भारतीय एकत्र राहून पुढे जात आहेत आणि संपूर्ण जगासाठी हे प्रेरणादायक मॉडेल ठरू शकते, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी दिले धन्यवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विट करून अध्यक्ष बराक ओबामा यांना धन्यवाद दिले आहेत. तुमचे शब्द हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहेत, असे मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22133

Posted by on Apr 16 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1782 of 2477 articles)


=मसरत आलमची मुजोरी कायम, कठोर कारवाईचे केंद्राचे आदेश= श्रीनगर/नवी दिल्ली, [१६ एप्रिल] - जम्मू-काश्मीर सरकारने काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटका केलेला ...

×