Home » कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » नव्या पीएफ नियमावरून बंगळुरूत हिंसाचार

नव्या पीएफ नियमावरून बंगळुरूत हिंसाचार

  • कामगारांनी पेटविल्या १५ बसेस
  • पोलिस ठाण्याचीही केली जाळपोळ

violent protests in Bengaluru against new epfoबंगळुरू, [१९ एप्रिल] – भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून पैसे काढण्याच्या केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे हिंसक पडसाद आज मंगळवारी बंगळुरूमध्ये उमटले. गारमेंट्‌स कारखान्यातील शेकडो कामगारांनी या नियमाविरुद्ध रस्त्यावर प्रचंड जाळपोळ करीत, १५ बसेस जाळल्या आणि पोलिस ठाण्यालाही आग लागली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात आणि अश्रूधुराच्या मार्‍यात अनेक जण जखमीही झाले. यात चार पोलिसांचाही समावेश आहे.
सोमवारपासूनच या हिंसाचाराला सुरुवात झाली होती. शहरातील हेब्बागोडी पोलिस ठाण्यावर जोरदार दगडफेक करून आग लावली. पोलिस ठाण्यासमोर पार्किंगमध्ये असलेल्या काही गाड्याही पेटविल्या. शहरात इतरत्र कामगारांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसलाही आग लावली. हिंसाचार पसरत असल्याचे पाहून पोलिसांनी आधी लाठीचार्ज आणि नंतर हवेत गोळीबार करून अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यात अनेक कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.
कामगारांच्या हिंसक आंदोलनामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीचीही कोंडी झाली. काही बस आणि अन्य वाहनांवरही दगडफेकीच्या घटना घडल्या. शहरातील स्थिती आता नियंत्रणात असल्याचे शहराचे पोलिस आयुक्त एन. एस. मघारिख यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27911

Posted by on Apr 20 2016. Filed under कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (464 of 2477 articles)


=बाळासाहेब थोरात यांचा घरचा अहेर= अहमदनगर, [१९ एप्रिल] - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काम केलं म्हणून ...

×