Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नायडू, सीतारमन, माथूर, रमेश, अकबर, नकवी विजयी

नायडू, सीतारमन, माथूर, रमेश, अकबर, नकवी विजयी

=सात राज्यांमधील राज्यसभा निवडणूक=
Venkaiah Naidu, Nirmala Sitharaman, op mathurनवी दिल्ली, [११ जून] – राज्यसभेच्या ३० जागा अविरोध निवडून आल्यानंतर सात राज्यांमधील २७ जागांसाठी घेण्यात आलेल्या आणि अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एम. व्यंकय्या नायडू, ओ. पी. माथूर, निर्मला सीमारमन, एम. जे. अकबर, मुख्तार अब्बास नकवी, अनिल दवे, महेश पोद्दार आणि कॉंगे्रसचे जयराम रमेश विजयी झाले आहेत.
राजस्थान आणि मध्यप्रदेशातील निवडणुकीचे निकाल पूर्णपणे भाजपाच्या बाजूने गेले, तर उत्तरप्रदेशातील स्वत:च्या वाट्याच्या सातही जागांवर सत्तारूढ समाजवादी पार्टीने विजय मिळविला आहे. येथे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या कॉंगे्रस नेते कपिल सिब्बल यांच्यापुढे आव्हान उभे करणार्‍या व्यावसायिक प्रीती महापात्रा यांना पराभव पत्करावा लागला. महापात्रा यांचा पराभव करीत सिब्बल यांनी बाजी मारली आहे. उत्तरप्रदेशात सपाचे बेनीप्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह, अमरसिंह, संजय सेठ, विश्‍वंभर प्रसाद निशाद, सुखराम सिंह यादव आणि सुरेंद्र नगर हे सातही उमेदवार सहज विजयी झाले. प्रीती महापात्रा यांच्या उमेदवारीमुळे चिंतीत झालेले सिब्बल यांचाही विजय झाल्याने कॉंगे्रसने सुटकेचा निश्‍वास सोडला.
राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यातील ३० जागा अविरोध निवडून आल्या होत्या. उत्तराखंडमधील एकमेव जागेवर कॉंगे्रसचे उमेदवार प्रदीप टाम्टा विजयी झाले.
राजस्थानमध्ये दोन तृतीयांश बहुमत असलेल्या भाजपाचे सर्वच चारही उमेदवार सहज विजयी झाले आहेत. यात केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओ. पी. माथूर, पूर्वीच्या डुंगरपूर राजघराण्याचे सदस्य हर्ष वर्धन आणि आरबीआयचे निवृत्त अधिकारी रामकुमार वर्मा यांचा समावेश आहे. नायडू आणि माथूर यांना प्रत्येकी ४२ मते, हर्ष वर्धन आणि वर्मा यांना प्रत्येकी ४० मते मिळाली. कॉंगे्रस समर्थित अपक्ष उमेदवार कमल मोरारका यांना ३४ मते मिळाली. उमेदवाराला विजयासाठी किमान ४० मते आवश्यक आहेत.
कर्नाटकात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन, कॉंग्रेसचे जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस आणि के. सी. राममूर्ती यांचा विजय झाला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशात ज्येष्ठ पत्रकार व भाजपा नेते एम. जे. अकबर, अनिल दवे आणि कॉंगे्रसचे विवेक तन्खा विजयी झाले आहेत. झारखंडमधून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार विजयी झाले आहेत. हरयाणामधून केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह आणि भाजपासमर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्र यांचा विजय झाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28555

Posted by on Jun 12 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (250 of 2477 articles)


=पॉल रेयान यांनी केली मोदींची स्तुती= वॉशिंग्टन, [११ जून] - भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा सहयोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत ...

×