Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » निकालाच्या दिवशी मोदींनी टीव्ही बघितला नाही

निकालाच्या दिवशी मोदींनी टीव्ही बघितला नाही

=लोकसभा निवडणूक, दुपारी १२ नंतरच घेतले फोन कॉल्स, पुस्तकातील दावा=
नवी दिल्ली, [१५ मार्च] – १६ मे २०१४ रोजी सकाळी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असताना ज्यांची लाट होती ते नरेंद्र मोदी मात्र टीव्हीसमोर न बघता ध्यानसाधना करत होते आणि त्यांनी दुपारी १२ नंतरच अभिनंदनाचे फोन स्वीकारण्यास सुरुवात केली, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली त्यावेळी मी एकटाच होतो आणि टीव्हीदेखील सुरू नव्हता. प्रचारादरम्यान आलेला थकवा लक्षात घेता मी माझे आध्यात्मिक कार्य संपवून ध्यानसाधना करत बसलो होतो. दुपारी १२ नंतर मी कॉल्स घ्यायला सुरुवात केली आणि पहिला कॉल तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी केला व भाजपाने निवडणुकीत मुसंडी मारल्याचे सांगितले, असे मोदी यांनी पुस्तकाच्या लेखकाला सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाबद्दलच्या अशा अनेक बाबी ‘द मोदी इफेक्ट : इनसाईड नरेंद्र मोदीज कॅम्पेन टू ट्रान्सफॉर्म इंडिया’, या लान्स प्राईस यांच्या पुस्तकात नमूद आहेत. लान्स प्राईस हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे माध्यम सल्लागार होते. भारतात हॅचती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात लेखकाची पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची मुलाखत आहे. शिवाय पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी हे मोदींचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्यांचे सल्लागार व विश्‍लेषकांच्या पथकातील सदस्यांच्याही मुलाखती आहेत.
कॉर्पोरेट घराण्यांनी भाजपाला दिलेल्या देणग्यांबाबतही या पुस्तकात सविस्तर चर्चा करण्यात आली. आम्ही कॉर्पोरेट्‌सकडून खाजगी विमाने वापरत असल्याबद्दल खूप काही लिहून आले. प्रचार अभियान चालविण्यासाठी गरज पडल्यास मी सायकलदेखील भाड्याने घेईन, हे लक्षात ठेवा, असे मोदी यांनी स्पष्ट केले. विविधतेने नटलेल्या एवढ्या मोठ्या देशात प्रभावी प्रचार अभियान राबवायचे म्हणजे विमानाने प्रवास करणे गरजेचे आहे. आम्ही ज्या कोणत्या गोष्टीचा वापर केला त्यासाठी पक्षाने पैसे मोजले. लोकसभा निवडणुकीत देशभरातील अनेक स्वतंत्र संस्थांनी आम्हाला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला, असेही मोदी यांनी म्हटले. विशेष करून योग गुरू बाबा रामदेव, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन यांनी बदल घडविण्यासाठी जनचळवळीत सहभाग घेतला, असे गौरवोद्‌गार मोदी यांनी काढले. २०१२ साली गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी माझा विचार होऊ शकतो याची मला स्पष्ट कल्पना होती. मात्र, मी याबाबत कधीच विचार केला नाही किंवा त्यासाठी लॉबिंग केले नाही, असेही मोदी यांनी नमूद केले आहे.
निवडणूक प्रचारकाळात मीडियासाठी उपलब्ध न होण्याचा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतला होता. पोकळी निर्माण व्हावी, असा माझा उद्देश होता आणि त्या पोकळीमुळेच सर्वांचे लक्ष आकर्षित करता आले, असेही मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदी यांनी राष्ट्रीय मीडियात आधी हिंदी आणि नंतर इंग्रजी वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या, हे विशेष.
मोदींना सत्तेत आणणार्‍या या अभूतपूर्व प्रचार अभियानाचे विस्तृत कव्हरेज करण्याची मुभा त्यांनी आपल्याला दिली होती. यादरम्यान मी चारवेळा मोदींना भेटलो आणि या प्रत्येकवेळी सुमारे तासभर किंवा त्यापेक्षा जास्तच चर्चा झाली. यावेळी मोदी अत्यंत सफाईदारपणे इंग्रजी बोलत होते आणि प्रचार अभियानाबाबत त्यांनी व्यक्त केलेली मते मी पुस्तकात घेतली आहेत, असे प्राईस यांनी सांगितले. वाराणसी मतदारसंघात केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बहुचर्चित लढाईबाबतही मोदी यांनी मत व्यक्त केले. केजरीवाल यांनी आपली उमेदवारी जाहीर करून राजकीय भूकंप घडविण्याचा दावा केल्यानंतर मोदींनी याबाबत मौन बाळगणेच पसंत केले. मौन हीच माझी शक्ती आहे, असे मोदी यांनी प्राईस यांना सांगितले होते. गोधरा मुद्याबाबत मात्र मोदी यांनी लेखकाशी बोलण्याचे टाळले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21475

Posted by on Mar 16 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1913 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - मशीद हे धार्मिक स्थळ नसून फक्त एक इमारत आहे आणि त्यामुळे ती कधीही तोडता येऊ ...

×