Home » छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमारांचा तांत्रिकासोबतचा व्हिडीओ सार्वजनिक

नितीशकुमारांचा तांत्रिकासोबतचा व्हिडीओ सार्वजनिक

  • भाजपावरील तंत्रमंत्राच्या आरोपाचा पर्दाफाश
  • तांत्रिक म्हणाला, लालू मुर्दाबाद

nitishkumar with tantrikपाटणा, [२४ ऑक्टोबर] – निवडणूक सभेत व्यासपीठ कोसळणे, पंखा हातावर पडणे, यासारख्या घटना म्हणजे भाजपाच्या तंत्रमंत्राचाच प्रकार आहे, आरोप राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी केल्यानंतर भाजपाने आज शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एका तांत्रिक बाबासोबतच्या भेटीचा व्हिडीओच सार्वजनिक केला. या भेटीत या तांत्रिकाने नितीश कुमार जिंदाबाद व चक्क लालू मुर्दाबादचा नारा दिला आहे.
भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर टाकला आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे, लालूप्रसाद यादव यांच्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठीच नितीशकुमार या तांत्रिकाकडे गेले होते. लालू नावाच्या भुतापासून मला मुक्त करा, अशी विनंती कुमारांनी या तांत्रिकाला केली होती. तेव्हा नितीशकुमारांना आलिंगन देऊन तांत्रिकाने नितीश जिंदाबाद आणि लालू मुर्दाबादचा नारा दिला होता.
नितीशकुमार एकीकडे लालूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी तांत्रिकाकडे जातात आणि त्याच लालूंचा हात धरून भाजपाविरोधात महाआघाडी स्थापन करतात. त्यानंतर याच महाआघाडीकडून भाजपावर तंत्रमंत्राचा आरोप केला जातो. नितीशकुमार यांचा तिहेरी चेहराच यातून उघड झाला आहे. बिहार निवडणुकीत आपल्याला विजय मिळणे कठीण आहे, हे चित्र भाजपासोबत संबंध तोडल्यानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळे ते निराश झाले आहेत, असा आरोप गिरिराज सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपावर तंत्रमंत्राचा आरोप करणारे लालूप्रसाद यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा भोंदू तांत्रिकांचाही मी बाप आहे. हे तांत्रिक माझे काहीच वाईट करू शकत नाहीत.
तंत्रमंत्राने काहीच होणार नाही : जेटली
नशिबाचे चक्र फिरल्यानंतर तंत्रमंत्र करून काहीही उपयोग होणार नाही, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नितीशकुमार यांच्यावर केली. बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा पराभव निश्‍चित झाला आहे. आता कोणताही तांत्रिक तुम्हाला वाचवू शकणार नाही, असेही जेटली म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25311

Posted by on Oct 25 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य (1285 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२४ ऑक्टोबर] - बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी असताना भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्यमंत्रिपदाची ...

×