Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » निरामय आयुष्यासाठी योग करू या : फडणवीस

निरामय आयुष्यासाठी योग करू या : फडणवीस

devendra-fadnavis-yogdayमुंबई, [२१ जून] – आज जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस दिवस साजरा होत असून, भारतानेही मागील पाच-सहा वर्षांपासून योग चिकित्सा पद्धती सुरू केली आहे. या चिकित्सा पद्धतीमुळे अंतर्गत शरीर स्वस्थ राहण्यासाठी मदत होते. या योग दिनी निरायम आयुष्यासाठी आपण सगळे योग करू या आणि सगळे जग निरामय करू या, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिस आणि स्पंदन आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे (पश्‍चिम) येथील रेक्लेमेशनच्या फ्लॅग पाईंट (रपेट स्थान) येथे योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, आमदार आशीष शेलार, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, पोलिस सहआयुक्त देवेन भारती, दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर, गायक शान, संगीतकार ललित, मुंबई पोलिस, योग प्रशिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा ठराव मांडला आणि दीडशेपेक्षा जास्त देशांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाकरिता पाठिंबा मिळाला. समान विचारधारा असलेल्या जगातील सर्व देशांनी योग स्वीकारला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
योग ही लोकचळवळ व्हावी : राज्यपाल
योगाला लोकचळवळ बनवून तो दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी समाजात योगाचे महत्त्व विशद करून जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठ व कैवल्यधाम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कलिना येथे योगविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राव बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यावेळी उपस्थित होते.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मन:शांती, सुदृढ आरोग्य व स्वस्थ जीवनासाठी उपयोगी आहे. नियमित योगामुळे सर्व शारीरिक व्याधींवर मात करणे शक्य आहे. आरोग्यसंपन्न भारताच्या उभारणीसाठी योग ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी योगदान द्यावे. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी आयुष मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेले योगाविषयीचे सामान्य नियम व महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी युवकांना प्रशिक्षण द्यावे. योग विषयक कार्य करणार्‍या कैवल्यधामसारख्या संस्थांनी कुशल योगा शिक्षकांच्या निर्मित्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही राव यांनी यावेळी केले.
गेट वे ऑफ इंडिया येथे योग आणि प्राणायाम
दुसर्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्ट, योग कला-उपासना फांऊडेशन आणि पतंजली यांच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे योग आणि प्राणायामाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक संजय कुमार, भाभा अणू संशोधन केंद्राचे सिनियर कंमाडर सबीर सिंग, पतंजलीचे सुरेश यादव आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन मंत्रालयात साजरा
दुसर्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभाग व सांताक्रुझच्या द योगा इन्स्टिट्यूट यांच्या वतीने सामूहिक योग व प्राणायाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध खात्यांचे मंत्री, मुख्य सचिव, सचिव आणि मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसा जयदेव योंगेद्र आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28696

Posted by on Jun 22 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (204 of 2476 articles)


=भारताला पाठिंबा द्या: अमेरिकेचे सदस्य देशांना आवाहन= वॉशिंग्टन, [२१ जून] - अणुपुरवठादार राष्ट्रसमूहाची (एनएसजी) वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी रात्रीपासून दक्षिण ...

×