Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » निर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी

निर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी

=नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर घणाघाती हल्ला=
modi campaign in Delhiनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – आम आदमी पार्टीवर बनावट कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्याचा आरोप होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पक्षावर आज घणाघाती हल्ला चढविला. ‘इतर पक्षांपेक्षा आपण अधिक प्रामाणिक असल्याचा दावा करणार्‍या आपचे बिंग फुटले आहे. या पक्षाने निर्लज्जपणाची हद्द ओलांडली आहे,’ अशा प्रखर शब्दात त्यांनी आपवर टीका केली.
‘खोटारडेपणा आणि अप्रामाणिकतेने ते दिल्लीचे राज्य चालविणार आहेत काय?’ असा टोकदार प्रश्‍नही त्यांनी विचारला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना शहरातील द्वारका उपनगरातील एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आम आदमी पार्टीसह कॉंग्रेसवरही चौफेर टीका केली.
‘मां-बेटा’ असे कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना संबोधून ते म्हणाले की,‘कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षात दिल्लीला पुरते लुटले आणि आता एक वर्षाआधी स्थापन झालेल्या नव्या आम आदमी पार्टीने दिल्लीला अवघ्या एका वर्षातच उद्‌ध्वस्त केले. दिल्लीला या स्थितीतून बाहेर काढण्याचे आणि या महानगराला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे.
आता दिल्लीचा राज्यकारभार बेईमान आणि खोटारड्या लोकांच्या स्वाधीन करायचा काय. एकदा केलेली चूक माफ केली जाऊ शकते. पण, जर कुणी आपली फसवणूक करीत असेल, तर त्याला कधीच माफ करता येत नाही. कॉंगे्रस आणि आम आदमी पार्टीने दिल्लीकरांची निव्वळ फसवणूकच केली आहे, असा आरोप करताना भाजपावर विश्‍वास ठेवा आणि स्थिर व सक्षम सरकारसाठी केवळ भाजपालाच निवडून द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20310

Posted by on Feb 4 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2128 of 2477 articles)


गृह व वाहन कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली आरबीआयने जाहीर केला पतधोरणाचा आढावा मुंबई, [३ फेब्रुवारी] - बाजारपेठ आणि ...

×