Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींच्या फाईल्स होणार सार्वजनिक

नेताजींच्या फाईल्स होणार सार्वजनिक

=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा=
Family members of Netaji Subhas Chandra Bose presenting a portrait of Netaji to PM Shri Narendra Modi!!नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केली असून, यामुळे नेताजींच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ उकलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नेताजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांची त्यांच्या ७, रेसकोर्स रोड या निवासस्थानी भेट घेतली असता पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या चर्चेच्या वेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि गृहमंत्री राजनाथसिंह प्रामुख्याने उपस्थित होते.
नेताजी बेपत्ता होण्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया नेताजींच्या जयंती दिनापासून म्हणजे २३ जानेवारी २०१६ पासून सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले. पंतप्रधानांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. नेताजी बेपत्ता होण्यामागचे गूढ उकलण्यात यावे, अशी मागणी त्यांचे नातेवाईक बरेच दिवसांपासून करत आहेत.
नेताजींच्या कुटुंबातील ३५ सदस्य पंतप्रधानासोबत झालेल्या भेटीच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्विट करताना पंतप्रधान म्हणाले, नेताजींशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती आपण इतर देशांना करणार आहे. याची सुरुवात डिसेंबरमध्ये रशियाशी चर्चा करून होईल. इतिहासाला झाकून ठेवण्याची गरज नाही. ज्या देशांना आपल्या इतिहासाचा विसर पडतो, ते नवीन इतिहास घडवू शकत नाहीत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25144

Posted by on Oct 15 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1336 of 2477 articles)


=पंतप्रधानांचा थेट आरोप= कोलकाता, [१४ ऑक्टोबर] - उत्तरप्रदेशच्या दादरी येथील हत्याकांड आणि पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे ...

×